अंदाजे ५ लाख रुपयांची हानी….!
आज सकाळच्या सुमारास लागली आग…!
प्रतिनिधी | मालवण : मालवण तालुक्यातील दांडी समुद्र किनारी असलेल्या मासेमारी साहित्य असलेल्या गोडाऊनला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. दांडी चर्च समोर मत्स्य व्यावसायिक रुजारीओ ऊर्फ बाबला पिंटो यांच्या मालकीचे गोडाऊन आहे.
हे गोडाऊन गेले काही महिने बंद असल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागण्याची माहिती मालवण नगरपालिकेला देण्यात आली होती मात्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने स्थानिक नागरिकांनी पाणी व अन्य आग विझवण्याच्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी धाव घेतली.
स्थानिक नागरिक व मच्छिमार यांनी धाव घेत आगीवार नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेली मासेमारी जाळी, बॅरल व अन्य मासेमारी साहित्य तसेच गोडाऊन छप्पर जाळून सुमारे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती गोडाऊनचे मालक श्री रुजारीओ ऊर्फ बाबला पिंटो यांनी दिली.