24.4 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

पर्यटन महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबा मोंडकर यांनी केले पर्यटन व्यावसायिकांना आवाहन…!

- Advertisement -
- Advertisement -

पर्यटन विकासासाठी पर्यटन संचालनालय व पर्यटन व्यावसायिक महासंघांच्या उपक्रमात पर्यटन व्यावसायिकांची उपस्थिती व सहभाग वाढवण्यावर दिला जातोय भर…!

वैभव माणगांवकर | मालवण : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित विविध पर्यटन योजनांचा माहिती देणारा पर्यटन प्रशिक्षण व चर्चा सत्रांचा उपक्रम 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल चिवला बीच मालवण येथे आयोजित केला गेला आहे .

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात अग्रेसर करण्याचा सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचा मानस असून यासाठी महासंघा तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत .सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की नजरेसमोर काय येतं समुद्रकिनारे, समृद्ध निसर्ग, गडकिल्ले ,लोककला ,खळाळते झरे, डोंगरदऱ्या, नारळ पोफळीच्या बागा, नारळ, काजू, फणस, भातशेती; चौमोळी छपराची घरे, वाडी, पानात उकडीचे मोदक, अंबापोळी, सुरमई पापलेट, कोंबडीवडा, कोकम सरबत आणि या सर्वांचा आस्वाद घ्यायला येणारा पर्यटक असे सगळे डोळ्यासमोर उभे राहते. जिल्ह्यात पर्यटन उद्योग हा आघाडीचा उद्योग आहे.शेतकरी, महिला बचत गट, तरुण-तरुणी, होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट; च्या माध्यमातून राहण्या-खाण्याची व फिरण्याच्या सुविधांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन या गोष्टींमुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे. या पर्यटन व्यवसायाला एका अधिकृत धोरणांमध्ये समाविष्ट करुन, नव्या जोमाने व उत्साहाने पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालय व सिंधुदुर्ग महासंघाच्यावतीने पर्यटनातील विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग कार्यशाळा तसेच चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.या प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रांमध्ये जिल्ह्यातील हॉटेल व रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जा मिळण्याची कार्यपद्धती तसेच राज्याचे कृषी पर्यटन विकास धोरण आणि बीच सॅक्स धोरण याविषयी माहिती देण्यात येईल तसे यासाठी पर्यटन विभागाच्या संचालनालयाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायिकांत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत होईल तसेच पर्यटनाच्या विविध संधी ओळखून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करण्याचा पर्यटन महासंघाचा प्रयत्न आहे. पर्यटन विभागाच्या विविध पर्यटन योजनांची माहिती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध घटकांना मिळावी म्हणून हा प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रांचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीने राज्य पर्यटन प्रशिक्षक श्री मनोज हाडवळे हे कृषी पर्यटनाचे धोरण व कृषी पर्यटनातील संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम राबवताना पर्यटन संचालनालयाच्या सोबतीने निसर्ग टूर्सचे संजय नाईक हे समन्वयक म्हणून सहभागी असणार आहेत. या प्रशिक्षण व चर्चासत्र उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्रात काम करत असलेल्या व भविष्यात रोजगाराच्या संधी शोधत असणाऱ्या मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. पर्यटन उपक्रम प्रशिक्षण वर्ग चर्चासत्रासाठी 100 रुपये प्रवेश फी असून प्रथम नावे नोंदविणाऱ्या 50 पर्यटन व्यावसायिकांनाच या चर्चासत्रात भाग घेता येणार आहे अधिक माहिती साठी 9421153035 संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हाध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी दिली आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पर्यटन विकासासाठी पर्यटन संचालनालय व पर्यटन व्यावसायिक महासंघांच्या उपक्रमात पर्यटन व्यावसायिकांची उपस्थिती व सहभाग वाढवण्यावर दिला जातोय भर...!

वैभव माणगांवकर | मालवण : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित विविध पर्यटन योजनांचा माहिती देणारा पर्यटन प्रशिक्षण व चर्चा सत्रांचा उपक्रम 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल चिवला बीच मालवण येथे आयोजित केला गेला आहे .

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात अग्रेसर करण्याचा सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचा मानस असून यासाठी महासंघा तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत .सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की नजरेसमोर काय येतं समुद्रकिनारे, समृद्ध निसर्ग, गडकिल्ले ,लोककला ,खळाळते झरे, डोंगरदऱ्या, नारळ पोफळीच्या बागा, नारळ, काजू, फणस, भातशेती; चौमोळी छपराची घरे, वाडी, पानात उकडीचे मोदक, अंबापोळी, सुरमई पापलेट, कोंबडीवडा, कोकम सरबत आणि या सर्वांचा आस्वाद घ्यायला येणारा पर्यटक असे सगळे डोळ्यासमोर उभे राहते. जिल्ह्यात पर्यटन उद्योग हा आघाडीचा उद्योग आहे.शेतकरी, महिला बचत गट, तरुण-तरुणी, होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट; च्या माध्यमातून राहण्या-खाण्याची व फिरण्याच्या सुविधांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन या गोष्टींमुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे. या पर्यटन व्यवसायाला एका अधिकृत धोरणांमध्ये समाविष्ट करुन, नव्या जोमाने व उत्साहाने पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालय व सिंधुदुर्ग महासंघाच्यावतीने पर्यटनातील विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग कार्यशाळा तसेच चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.या प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रांमध्ये जिल्ह्यातील हॉटेल व रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जा मिळण्याची कार्यपद्धती तसेच राज्याचे कृषी पर्यटन विकास धोरण आणि बीच सॅक्स धोरण याविषयी माहिती देण्यात येईल तसे यासाठी पर्यटन विभागाच्या संचालनालयाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायिकांत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत होईल तसेच पर्यटनाच्या विविध संधी ओळखून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करण्याचा पर्यटन महासंघाचा प्रयत्न आहे. पर्यटन विभागाच्या विविध पर्यटन योजनांची माहिती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध घटकांना मिळावी म्हणून हा प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रांचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीने राज्य पर्यटन प्रशिक्षक श्री मनोज हाडवळे हे कृषी पर्यटनाचे धोरण व कृषी पर्यटनातील संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम राबवताना पर्यटन संचालनालयाच्या सोबतीने निसर्ग टूर्सचे संजय नाईक हे समन्वयक म्हणून सहभागी असणार आहेत. या प्रशिक्षण व चर्चासत्र उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्रात काम करत असलेल्या व भविष्यात रोजगाराच्या संधी शोधत असणाऱ्या मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. पर्यटन उपक्रम प्रशिक्षण वर्ग चर्चासत्रासाठी 100 रुपये प्रवेश फी असून प्रथम नावे नोंदविणाऱ्या 50 पर्यटन व्यावसायिकांनाच या चर्चासत्रात भाग घेता येणार आहे अधिक माहिती साठी 9421153035 संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हाध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी दिली आहे .

error: Content is protected !!