चिंदर | विवेक परब,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०१वी पुण्यतिथी आज ग्रामपंचायत चिंदर येथे उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी लोकमान्य टिळकांच्या विचार सरनीची आज नितांत गरज आहे व त्याप्रमाणे चालल्यावर समाजाची उन्नती व विकास नक्कीच होईलच असे विचार मांडले.
कार्यक्रम स्थळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर व आबा पवार, सिध्देश नाटेकर हे उपस्थित होते.