वैशाली पंडित | उपसंपादक : सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि समस्या दोन्ही प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहेत.प्रत्येक कालखंडात समाजाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले त्या त्या वेळी समाजातील विचारवंतांनी समाजप्रबोधनाचे कार्य केल्याची इतिहास साक्ष आहे.
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातही ज्येष्ठ नागरिक या विषयावर अनेक विचारवंत आपापल्या परीने समाजाला जाणीवपूर्वक जागृत करताना दिसतात. त्यातल्याच एक तळमळीच्या कार्यकर्त्या आहेत डाॅ.रोहिणी पटवर्धन.पुणे, यांनी जेराँटाॕलाॕजी म्हणजेच वृद्ध कल्याणशास्त्र या विषयात पी एच डी केली आहे. वृद्धापकाळ वृद्धांसाठी आनंदी आणि सुखकर होणे जेवढे महत्वाचे तेवढेच वृद्धांची काळजी घेणा-यांसाठीही हे काम लादलेले ओझे वाटू नये हे ही महत्वाचे आहे.यासाठी कोणकोणती माहिती आणि प्रशिक्षण असायला हवे याची प्राथमिक माहिती आपल्या अडीच तासांच्या व्याख्यानाद्वारे डाॅ. रोहिणी पटवर्धन देतात.
उद्या रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ असे मालवण येथे बॕ.नाथ पै सेवांगण येथे डाॅ. पटवर्धन यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. वृद्धांबद्दल आस्था असणा-या सगळ्या वयोगटातील लोकांसाठी हा कार्यक्रम मौल्यवान आहे.