सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
आचरा | विवेक परब : पळसंब ग्रामपचायत हद्दीत असलेल्या बीएसएनएल टॉवर ची २ जी सेवा तीन महिन्या नंतर सोमवार पासून पूर्ववत झाली आहे. सदर सेवा व प्रलंबित प्रश्न ३० सप्टेंबर पूर्वी दूर करण्यात येतील असे लेखी आश्वासन मालवण सब डिव्हिजनचे अधिकारी प्रविण कवडे यांनी पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात भेट देत सरपंच चंद्रकांत गोलतकर याना दिले होते. परंतु दिलेली मुदत टळूनही कोणतीही कार्यवाही संबंधितांकडून न झाल्याने याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिला होता. दरम्यान सोमवारी बीएसएनलच्या सावंतवाडी येथील कार्यालयातून अभियंता श्री सांडे यांनी पळसंब येथे येत नादुरुस्त टॉवर यंत्रणा दुरुस्त केली. पूर्ववत ‘2 जी’ सेवा मिळणार असल्याने सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले. पळसंब परिसरातील बि.एस.एन.एल. भ्रमणध्वनी ग्राहकांनी सदर कामावर तूर्तास समाधान व्यक्त केले आहे.