चालक मद्यधुंद अवस्थेत होता असल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती ; पोलिसांनी घेतले आहे ताब्यात.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारा चंदगड येथील डंपर क्र ( MH- 46 F – 0827 ) ने मोलमजुरी करून घरी परतणाऱ्या ५ महिलांना मागून जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी सवा सहाच्या दरम्यान घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच काळसे गावातील रहिवासी पोलीस उपिनिरीक्षक नितिन कदम आणि पोलीस पाटील विनायक प्रभु, राजेंद्र परब , अण्णा गुराम , प्रमोद काळसेकर यांच्या सह ग्रामस्थ घटनास्थळी तातडीने दाखल झाले त्यानंतर नितीन कदम यांनी मालवण पोलीस स्थानकात दूरध्वनी वरुन अपघाताची माहिती दिली आणि १०८ रुग्णवाहिका बोलावून उपस्थितांच्या मदतीने जखमीना रुग्णालयात दाखल केले.
![](https://aaplisindhunagari.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0190-462x1024.jpg)
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे यांच्यासह सुहास पांचाळ , राजन पाटील , सुहास शिवगण , यांच्या सह अन्य पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
![](https://aaplisindhunagari.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0192-630x1024.jpg)
या भीषण अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर ( ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५ )) अनिता चंद्रकांत काळसेकर (५५ ) प्रमिला सुभाष काळसेकर ( ४० ) प्रज्ञा दिपक काळसेकर ( ३५ ) या चौघीजणी जखमी झाल्या आहेत. जखमी महिला रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू झाले आहे.