मसुरे | प्रतिनिधी : हिंदू धर्म रक्षक श्रीमंत भागोजी शेठ कीर यांचा जन्मोत्सव २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, प्रतिवर्षाप्रमाणे मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभ यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता मालवण शहरातील दैवज्ञ हॉल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी व भगिनींनी या सभेला मित्र परिवारासहित हजर राहून सभेची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीकांत सावंत ( उपाध्यक्ष, भागोजी शेठ किर कृती समिती) यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -