मसुरे | प्रतिनिधी : श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांच्या वतीने मुंबईतील तरुणांसाठी MPL मुणगे प्रीमिअर लीग – ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २२ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी भांडुप गाव मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्व खेळाडू लिलाव पद्धतीने संघाना देण्यात आले आहेत. लिलाव दिनांक ८ फेब्रुवारी ला झाला. त्यात विशेष करून मुणगे गावाहून आलेले संस्थेचे सदस्य आणि खेळाडू तसेच संघमालक उपस्थित झाले होते.
मुंबईत प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेला गावातील विविध सामाजिक – शैक्षणिक संस्था, प्रशासकीय व्यक्तिमत्त्व, देवस्थान कमिटी, लगतच्या गावातील मित्र मंडळी त्याच बरोबर गावातील नामांकित व्यक्तिमत्व आणि मित्र परिवार यांना आमंत्रित केले आहे.
या स्पर्धेत गावातीलच क्रिकेट प्रेमी रहिवासी श्री गोविंद सावंत,श्री तुषार मुणगेकर, श्री नितिन माळकर , श्री उल्हास लब्दे ,श्री जतीन राणे,श्री सतीश साळसकर, श्री निवृत्ती पडवळ, श्री प्रवीण आईर आणि मुंबईतील भगवती क्रिकेट क्लब यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ही स्पर्धा स्पर्धा रुपात न पाहता सर्व जेष्ठ मंडळी ,तरुण मंडळी आणि विद्यार्थी यांनी दोन दिवस खेळाच्या माध्यमातून मुंबई सारख्या विभागात एकत्रित येत तरुणाईच्या नवनवीन संकल्पनांना वाव देण्याचे साधन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असल्याचे मत संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री उदय लब्दे सचिव ,श्री योगेश सावंत ,खजिनदार श्री सुनील हिर्लेकर आणि सर्व सदस्य यांनी व्यक्त केले.
श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांच्या वतीने मुंबईतील तरुणांसाठी MPL मुणगे प्रीमिअर लीग – ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २२ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी भांडुप गाव मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्व खेळाडू लिलाव पद्धतीने संघाना देण्यात आले आहेत. लिलाव दिनांक ८ फेब्रुवारी ला झाला. त्यात विशेष करून मुणगे गावाहून आलेले संस्थेचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित झाले होते.
मुंबईत प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेला गावातील विविध सामाजिक – शैक्षणिक संस्था, प्रशासकीय व्यक्तिमत्त्व, देवस्थान कमिटी, लगतच्या गावातील मित्र मंडळी त्याच बरोबर गावातील नामांकित व्यक्तिमत्व आणि मित्र परिवार यांना आमंत्रित केले आहे.
या स्पर्धेत गावातीलच क्रिकेट प्रेमी रहिवासी श्री गोविंद सावंत,श्री तुषार मुणगेकर, श्री नितिन माळकर , श्री उल्हास लब्दे ,श्री जतीन राणे,श्री सतीश साळसकर, श्री निवृत्ती पडवळ, श्री प्रवीण आईर आणि मुंबईतील भगवती क्रिकेट क्लब यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ही स्पर्धा स्पर्धा रुपात न पाहता सर्व जेष्ठ मंडळी ,तरुण मंडळी आणि विद्यार्थी यांनी दोन दिवस खेळाच्या माध्यमातून मुंबई सारख्या विभागात एकत्रित येत तरुणाईच्या नवनवीन संकल्पनांना वाव देण्याचं साधन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असल्याचं मत संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री उदय लब्दे सचिव ,श्री योगेश सावंत ,खजिनदार श्री सुनील हिर्लेकर आणि सर्व सदस्य यांनी व्यक्त केले.