26.8 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

छत्रपती शिवजयंती सोहळ्यानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने बांद्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : यंदाच्या छत्रपती शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बांदा येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, अक्षय मयेकर, प्रथमेश राणे, अनुप बांदेकर, नारायण बांदेकर, तनिष मेस्त्री, रिना मोरजकर, मिताली सावंत आदी उपस्थित होते.

मुख्य छत्रपती शिवजयंती सोहळा १९ फेब्रुवारीला खेमराज मेमोरियल शाळेच्या पटांगणावर होणार आहे. याठिकाणी किल्ल्याची भव्य दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. स्वराज्य प्रतिष्ठान हे ‘शिवविचार हाच आमचा धर्म’ हे ब्रीद घेऊन कार्य करत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला सविस्तरपणे माहिती व्हावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी १२ तारखेला सकाळी ९ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन जि. प. केंद्रशाळा बांदा क्र. १ येथे करण्यात आले आहे. अंगणवाडी ते इयत्ता पहिली या गटासाठी रंगभरण ठेवण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी या गटासाठी गडकिल्ले हा विषय, इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग हा विषय तर इयत्ता नववी ते खुला गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोट्रेट हा विषय ठेवण्यात आला आहे. यातील विजेत्यांना पहिल्या गटासाठी अनुक्रमे रुपये ५००, ३००, २०० तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी रुपये १०० पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उर्वरित सर्व गटांसाठी
रुपये १०००, ७०० , ५०० तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी रुपये २०० पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या स्पर्धकांनी केदार कणबर्गी – मो. ९४२२३९४०७५ यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. चित्रकलेचा कागद संस्थेतर्फे देण्यात येईल. रंग साहित्य स्वतः स्पर्धकांनी आणावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी १६ तारखेला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे करण्यात आले आहे. स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरु होईल. इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी ‘मला आवडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा’ हा विषय असून यासाठी सादरीकरण वेळ ३ ते ५ मिनिटे आहे. पाचवी ते आठवी या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटक’, ‘धिरोदत्त राजा छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे.

इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्थकारण’, ‘रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेती आणि व्यापार विषयक धोरण’, ‘छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट इंजिनियर’ हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी भूषण सावंत – ७५१७८५०२०४, अक्षय मयेकर – ९५०३८७१९२४ यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

रविवारी १९ फेब्रुवारीला शालेय गटात वेषभूषा स्पर्धा, पोवाडा किंवा शिवगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी ४ वाजता खेमराज मेमोरीयल प्रशाळेच्या मैदानावर होणार आहे. वेशभूषा स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व खुला गट असून ऐतिहासिक ( शिवकालीन) हा विषय ठेवण्यात आला आहे. पोवाडा किंवा शिवगीत गायन स्पर्धा ही स्पर्धा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी, इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी व खुला गट मध्ये होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नारायण बांदेकर – ९९६०३९३३१२ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेसाठी सर्वांना प्रवेश विनामुल्य असून या स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित होणार आहेत. प्रत्येक स्पर्धेकाला वरीलपैकी कोणत्याही दोन स्पर्धेतच सहभाग घेता येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : यंदाच्या छत्रपती शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बांदा येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, अक्षय मयेकर, प्रथमेश राणे, अनुप बांदेकर, नारायण बांदेकर, तनिष मेस्त्री, रिना मोरजकर, मिताली सावंत आदी उपस्थित होते.

मुख्य छत्रपती शिवजयंती सोहळा १९ फेब्रुवारीला खेमराज मेमोरियल शाळेच्या पटांगणावर होणार आहे. याठिकाणी किल्ल्याची भव्य दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. स्वराज्य प्रतिष्ठान हे 'शिवविचार हाच आमचा धर्म' हे ब्रीद घेऊन कार्य करत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला सविस्तरपणे माहिती व्हावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी १२ तारखेला सकाळी ९ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन जि. प. केंद्रशाळा बांदा क्र. १ येथे करण्यात आले आहे. अंगणवाडी ते इयत्ता पहिली या गटासाठी रंगभरण ठेवण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी या गटासाठी गडकिल्ले हा विषय, इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग हा विषय तर इयत्ता नववी ते खुला गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोट्रेट हा विषय ठेवण्यात आला आहे. यातील विजेत्यांना पहिल्या गटासाठी अनुक्रमे रुपये ५००, ३००, २०० तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी रुपये १०० पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उर्वरित सर्व गटांसाठी
रुपये १०००, ७०० , ५०० तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी रुपये २०० पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या स्पर्धकांनी केदार कणबर्गी - मो. ९४२२३९४०७५ यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. चित्रकलेचा कागद संस्थेतर्फे देण्यात येईल. रंग साहित्य स्वतः स्पर्धकांनी आणावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी १६ तारखेला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे करण्यात आले आहे. स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरु होईल. इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी 'मला आवडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा' हा विषय असून यासाठी सादरीकरण वेळ ३ ते ५ मिनिटे आहे. पाचवी ते आठवी या गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटक', 'धिरोदत्त राजा छत्रपती शिवाजी महाराज' हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे.

इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी या गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्थकारण', 'रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज' हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. खुल्या गटासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेती आणि व्यापार विषयक धोरण', 'छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट इंजिनियर' हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी भूषण सावंत - ७५१७८५०२०४, अक्षय मयेकर - ९५०३८७१९२४ यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

रविवारी १९ फेब्रुवारीला शालेय गटात वेषभूषा स्पर्धा, पोवाडा किंवा शिवगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी ४ वाजता खेमराज मेमोरीयल प्रशाळेच्या मैदानावर होणार आहे. वेशभूषा स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व खुला गट असून ऐतिहासिक ( शिवकालीन) हा विषय ठेवण्यात आला आहे. पोवाडा किंवा शिवगीत गायन स्पर्धा ही स्पर्धा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी, इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी व खुला गट मध्ये होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नारायण बांदेकर - ९९६०३९३३१२ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेसाठी सर्वांना प्रवेश विनामुल्य असून या स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित होणार आहेत. प्रत्येक स्पर्धेकाला वरीलपैकी कोणत्याही दोन स्पर्धेतच सहभाग घेता येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!