रत्नागिरीच्या नौकेवर ‘चिनी डिजिटल सिग्नल फ्रिक्वेन्सी’
गिर्ये समुद्रात नौका ताबयात सागर सुरक्षा दल आणि मत्स्य विभागाची कारवाई
देवगड | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मासेमारी करणाऱ्या लोकांवर व्हिटीएस यंत्रणेची ‘चायनीज डिजिटल सिग्नल फ्रिक्वेन्सी’ रत्नागिरी किनारा सुरक्षा तथा कोस्ट गार्ड विभागाला मिळाल्याने सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. या पार्श्वभूमीवर देवगड सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांनी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गिर्ये समुद्र पट्ट्यात रत्नागिरी येथील एक नौका ताब्यात घेतलि या नौकेवर चिनी बनावटीची व्हिटीएस यंत्रणा सापडल्याने सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांनी ही नौका कारवाईस देवगड बंदरात आणुन मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली. दरम्यान त्या नौकेवर विनापरवाना चिनी बनावटीची बीटीएस यंत्रणा वापरण्यात येत होती तसेच या नौकेतून पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी सुरू होति अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त रवींद्र मालवणकर यांनी दिली. भारताच्या सीमेवर चीनकडून सतत कुरघोड्या सुरू आहेत या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील देवगड ते कुणकेश्वर दरम्यानच्या समुद्र पट्ट्यात मासेमारी करणाऱ्या नौकांवर व्हीटीएस यंत्रणेची चीनी सिग्नल फ्रिक्वेन्सी कार्यरत असल्याची माहिती शनिवारी रत्नागिरी कोस्टर गार्ड ला मिळाल्याने किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाले मात्र देवगड मत्स विभागाकडे गस्ती नौका नसल्याने सागरी सुरक्षा दलाला याबाबत माहिती देऊन समुद्रात चीनी सिग्नल फ्रिक्वेन्सी कार्यरत असणाऱ्या बोटींचा शोध घेण्याची मोहीम आखण्यात आली. शनिवारी समुद्रात दाट धुके व वादळ सदृश्य स्थिती असल्यामुळे सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांना ‘सागरकन्या’ गस्ती नौकेने खोल समुद्रात ही मोहीम राबवणे शक्य झाले नाही. समुद्रात सुमारे चार ते पाच नॉटीकल पर्यंत वादळ सदृश्य स्थिती दिसून लागल्याने ही मोहीम राबवणे धोकादायक बनले होते त्यामुळे ही मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सागरी सुरक्षा रक्षक दल व मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे राबविणे तालुक्याच्या गिरिया समुद्रा पट्ट्यात 11 नॉटिकल अंतरात् रत्नागिरी येथील ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’ मिळणारी एक नौका सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांना आढळून आल्याने या नौकेची पोलिसांनी पाहणी केली
रत्नागिरीची ती नौका रत्नागिरी येथील इब्राहिम दाऊद साखरकर यांच्या मालकीची असल्याचे समोर आले या नौकेचा क्रमांक (आय एन डी एम एच फोर एम एस ४०२० )असून या नौकेवर विनापरवाना चिनी बनावटीची व्ही टी एस यंत्रणा बसविण्यात आली होती त्यामुळे ही नौका सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईसाठी देवगड बंदरात आनंद अनात मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली या नौकेवर 31 कर्मचारी होते या मोहिमेत देवगड सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक कऱ्हाडे,तेली ,पोलीस हवालदार निलेश पाटील ,पोलीस नाईक तांबे आदी सहभागी झाले होते
मत्स्य विभागाने ही नांव ताब्यात घेतल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तसेच नौकेवरील मासळीचा लिलाव करून नौकेवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्या समोर सादर करण्यात येईल अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त मालवणकर यांनी दिली यांना या नौकेवर चिनी बनावटीची व्ही टी एस यंत्रणा कार्यरत होती तसेंच या नौकेला ट्रॉलिंग चा परवाना असताना नौकेतून पर्ससीन जाळ्यात द्वारे मासेमारी करण्यात येत होतीव्ही टी एस यंत्रणा कार्यरत होती तसेच या नौकेला ट्रॉलिंग चा परवाना असताना नौकेतून पर्ससीन जाळ्यात द्वारे मासेमारी करण्यात येत होते याबाबत सागरी अधिनियम कायद्याप्रमाणे योग्य कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले
देवगड समुद्रात मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या नौकेवर चिनी बनावटीची यंत्रणा होती या यंत्रणेला भारतीय रजिस्ट्रेशन नव्हते त्यामुळे चिनी भाषेतील फ्रिक्वेन्सी रडार यंत्रणेला मिळू लागल्याने कोस्टगार्ड ‘अलर्ट’झाले
3 नौकांवर चिनी फ्रिक्वेन्सी मिळत असल्याची माहिती कोस्टगार्ड कडून देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात एकच नौका सापडल्याने इतर २ नौकालनिही यंत्रणा काढून टाकली असावी असा संशय मच्छीमारांनी मधून व्यक्त होत आहे.
रत्नागिरीच्या मासेमारी नौकांवर चिनी बनावटीची विनापरवाना भेटी एस यंत्रणा लावण्यात आली होती तसेच ट्रोलिंगचा परवाना असताना पर्सनेट जाळ्यात द्वारे मासेमारी करण्यात येत होती . ट्रोलिंग मासेमारीची हद्द ओलांडून ही नौका देवगडच्या समुद्रात मासेमारी करत होती. ट्रोलींगच्या नौकेवर पर्सनेट ची जाळी विनापरवाना यंत्रणा व मासेमारीचे जलदी शेत्र असे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात बसविणाऱ्या या नौका राजरोसपणे मासेमारी करत आहेत या प्रकरणाबाबत रत्नागिरीचे मत्स्य विभाग अनभिज्ञ असल्याचे जाणवले असे सूत्रांकडून समजते.
सागरी हेरगिरी व शत्रूच्या विविध डिजिटल कुरघोडींसाठी आता वेळीच आणखीन सक्षम डिजिटल यंत्रणा देशाकडे व खासकरुन अरबी समुद्रकिनारी असली पाहिजे असे सुरक्षातज्ञांचे म्हणणे आहे.