24.6 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

आचरा येथे आकाश दर्शन उपक्रम संपन्न ; यशराज प्रेरणा समूह आचरा व रानमित्र आचरा समूहाचा संयुक्त उपक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथील यशराज प्रेरणा समूह आचरा व रानमित्र आचरा समूह यांचा संयुक्तपणे ‘आकाश दर्शन’ कार्यक्रम ३ फेब्रुवारीला रात्री संपन्न झाला.

अनेक लोकांना आकाश दर्शनासंबंधी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. आपणही आकाश पहावे आकाशातील खगोलांची माहिती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी यशराज प्रेरणा समूह आचरा व रानमित्र आचरा यांनी खगोल अभ्यासक मंदार माईणकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम आखला होता.

खगोल प्रेमींना सुमारे पन्नास हजार वर्षांनी एकदा दिसणारा धुमकेतू दुर्बिणीच्या सहाय्याने दाखविला तसेच आकाशातील ग्रह गोलांविषयी व चंद्राविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या संधीचा लाभ आचरा परिसरातील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी व खगोल प्रेमींनी घेतला. याप्रसंगी यशराज प्रेरणा समुहाचे मंदार सरजोशी, रानमित्र आचराचे स्वप्निल गोसावी, सुशांत सावंत, राजेश भिरवंडेकर व इतर सेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी खगोल मार्गदर्शक मंदार माईणकर यांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथील यशराज प्रेरणा समूह आचरा व रानमित्र आचरा समूह यांचा संयुक्तपणे 'आकाश दर्शन' कार्यक्रम ३ फेब्रुवारीला रात्री संपन्न झाला.

अनेक लोकांना आकाश दर्शनासंबंधी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. आपणही आकाश पहावे आकाशातील खगोलांची माहिती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी यशराज प्रेरणा समूह आचरा व रानमित्र आचरा यांनी खगोल अभ्यासक मंदार माईणकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम आखला होता.

खगोल प्रेमींना सुमारे पन्नास हजार वर्षांनी एकदा दिसणारा धुमकेतू दुर्बिणीच्या सहाय्याने दाखविला तसेच आकाशातील ग्रह गोलांविषयी व चंद्राविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या संधीचा लाभ आचरा परिसरातील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी व खगोल प्रेमींनी घेतला. याप्रसंगी यशराज प्रेरणा समुहाचे मंदार सरजोशी, रानमित्र आचराचे स्वप्निल गोसावी, सुशांत सावंत, राजेश भिरवंडेकर व इतर सेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी खगोल मार्गदर्शक मंदार माईणकर यांचे आभार मानले.

error: Content is protected !!