ग्रामपंचायत बांदिवडे बुद्रुक आणि युवा परिवर्तन कुडाळचा संयुक्त उपक्रम.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायत आणि युवा परिवर्तन कुडाळचा संयुक्त उपक्रम असणारे मार्गदर्शन शिबीर सोमवारी ६ फेब्रुवारीला आयोजीत करण्यात आले आहे.
बांदिवडे गावातील तरुण तरुणींना स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन करणे आणि त्यांना सक्षम वर्तमान आणि भविष्य देणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे असे सरपंच आशू मयेकर आणि ग्रामपंचायत सदस्य नारायण परब यांनी ग्रामपंचायतच्या वतीने स्पष्ट केले आहे. केंद्र शाळा क्र .१ इथे हे शिबीर संपन्न होणार आहे.
सोमवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत चालणार्या या शिबिराचा गावातील सर्व तरुण व तरुणींनी व महिला बचत समूहांनी लाभ घ्यावा असे जाहिर आवाहन बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायत आणि सरपंच आशू मयेकर यांनी केले आहे.