सद्गुरु वामनराव पै यांचा सतशिष्य सुनील पालव यांचे विशेष व्यावहारीक मार्गदर्शन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुवळे येथे २२ जानेवारीले जीवनविद्या मिशन जोगेश्वरी शाखे तर्फे आयोजीत ग्राम समृद्धी अभियान अंतर्गत महिला बचत गटांना ‘उद्योग हाच योग’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री सदगुरु वामनराव पै यांने सतशिष्य सुनील पालव (कुडाळ शाखा ) यांनी विविध प्रकारे अनेक उत्तम व्यवाहारीक उदाहरणे देऊन उपस्थित महिला व सर्वांनाच संबोधीत केले.
या कार्यक्रमासाठी उपसरंपच प्रभूदेसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अजय कदम, शिरगांव प्रभाग समन्वयक अभिजीत चव्हाण, आर.सी. आर. सौ. अमृता नारायण लाड , सौ. नीलांबरी पालव ( कुडाळ शाखा ) , जीवन विद्या मिशन जोगेश्वरी शाखेचे कार्यकते कार्याध्यक्ष प्रकाश पांचाळ, मोहन कदम , चंद्रकांत घाडी, शिवानी मोहिनी , सौ प्रतिभा पांचाळ असे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यावेळी जीवन विद्यामिशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.