27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

अनिल सरमळकर हा नाटककार गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर यांचा सशक्त वारसदार : रतन थियाम

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : ‘इंडियन थिएटर लिजंड’ किंवा ज्यांना भारतीय व मणिपुरी रंगभूमीवरील जिवंत दंतकथा म्हणले जाते असे नाट्यमहर्षी ज्येष्ठ महान नाटककार दिग्दर्शक रतन थियाम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, दिग्दर्शक व नाट्यकर्मी अनिल सरमळकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

रतन थियाम यांनी त्यांच्या प्रशंसा संदेशात म्हणले आहे की भारतीय रंगभूमी सशक्त आहेच त्याहूनही मराठी रंगभूमीला स्वताचे वेगळे सामर्थ्य आहे मात्र मराठी असूनही आपले नाट्यलेखन इंग्रजीतुन करणारा आजचा आघाडीचा तरूण इंग्रजी नाटककार अनिल सरमळकर या नाटककाराची इंग्रजी नाटके वाचल्यानंतर मी स्तंभीत झालो. अलीकडील काळात कुठल्याही तरूण नाटकाराकडे इतकी नैसर्गिक व्यापक दृष्टी आणि भव्य नाटक लिहिण्याची क्षमता मी पाहिली नाही. अनिलच्या या लेखनातून तो सक्षम नाटककार आहे हे जाणवले. त्याने लेखनात अंतर्भूत केलेली नाटकाच्या सर्व पातळ्यांवर रचलेली, थक्क करणारी प्रायोगिकता पाहून सृजन मन देखील सुखावले. ! एक तरूण सशक्त नाटककार मिळाला याचा आनंद झाला. मला खात्री आहे की भारतीय रंगभूमीला जो बादल सरकार विजय तेंडुलकर आणि डाॅ. गिरीश कर्नाड सारख्या सामर्थ्यवान नाटककारांचा समृद्ध वारसा आहे त्याचा वारसदार होण्याचे एका परिपूर्ण नाटककाराचे सर्व गुण अनिल सरमळकर या तरूण इंग्रजी नाटककारामधे आहेत असा मला विश्वास आहे.

रतन थियाम म्हणजे भारतीय आणि जागतिक रंगभूमीला लाभलेले एक प्रतिभाशाली नाट्यरत्न आहेत.आपल्या मणीपूरी रंगभूमीची व्यापकता त्यांनी पूर्ण जगाला दाखवताना नव्या रंगभूमीचेही आख्यान मांडले त्यानी लिहिलेली नाटके आणि त्यांचे अद्भुत सादरीकरण आणि त्यांनील उत्तुंग अर्थपूर्णता त्यातील रंग आणि प्रकाशाचे अर्थनिर्णयन त्यातील वेधकता आणि दिपवून टाकणारी भव्य दृष्यात्मकता सारेच श्रेष्ठ दर्जाचे ! भारतीय रंगभूमीला जागतिक पातळीवर स्वताचे अढळ स्थान प्राप्त करुन देण्याचे अद्वितीय कार्य रतन थियाम यांनी केले आहे.

अनिल सरमळकर यांनी लिहिलेली द फाॅक्स , इटस् ऑलरेडी टुमाॅरो, ॲरिस्टल ब्रेक अप, व्हल्चर व्हिस्पर्स ही इंग्रजी नाटके रतन थियाम यांनी वाचल्यानंतर प्रभावीत होवुन त्यांनी अनिल सरमळकर हा तरूण नाटकार बादल सरकार,विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड या सारख्या श्रेष्ठ भारतीय नाटकारांचा सशक्त वारसदार ठरेल असे उद्गार काढले आहेत.

दरम्यान अलिकडेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपुर यांनीही अनिल सरमळकर यांच्या लेखनाचे कौतुक करताना ‘ सर्वच कलांचे टोकाचे व्यवसायिकीकरण होत असताना आणि रंगभूमीही सपक होत असताना अनिल सरमळकर यांचे हे नाट्यलेखन दर्जेदार वेगळे आहेच पण हे लेखन आज महत्वाचे आहे असा अभिप्राय दिला होता .

दरम्यान The fox या नाटकाला देश परदेशातून वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कलावंत लेखक दिग्दर्शक समीक्षक विचारवंत The fox चा गौरव करत असुन अमेरिका व इंग्लंड येथील प्रतिष्ठित विद्यापीठांतही हे नाटक पोहोचले आहे . दरम्यान या नाटकाची पहिली भारतीय आवृत्ती संपली असुन लवकरच The fox ची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.

त्याचप्रमाणे The fox या नाटकाची त्रिनाट्यधारा प्रकाशित होणार असुन या ‘ ट्रायॉलॉजी ‘ मधील दुसरा भाग असणारे अनिल सरमळकर यांचे
‘ Its Already Tomorrow ‘
हे नाटक लवकरच प्रकाशित होइल तर तिसरा भाग असणारे ‘ Vulture Whisperes ‘ हे नाटक त्यानंतर प्रकाशित होणार असल्याचे नाटककार अनिल सरमळकर यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : 'इंडियन थिएटर लिजंड' किंवा ज्यांना भारतीय व मणिपुरी रंगभूमीवरील जिवंत दंतकथा म्हणले जाते असे नाट्यमहर्षी ज्येष्ठ महान नाटककार दिग्दर्शक रतन थियाम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, दिग्दर्शक व नाट्यकर्मी अनिल सरमळकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

रतन थियाम यांनी त्यांच्या प्रशंसा संदेशात म्हणले आहे की भारतीय रंगभूमी सशक्त आहेच त्याहूनही मराठी रंगभूमीला स्वताचे वेगळे सामर्थ्य आहे मात्र मराठी असूनही आपले नाट्यलेखन इंग्रजीतुन करणारा आजचा आघाडीचा तरूण इंग्रजी नाटककार अनिल सरमळकर या नाटककाराची इंग्रजी नाटके वाचल्यानंतर मी स्तंभीत झालो. अलीकडील काळात कुठल्याही तरूण नाटकाराकडे इतकी नैसर्गिक व्यापक दृष्टी आणि भव्य नाटक लिहिण्याची क्षमता मी पाहिली नाही. अनिलच्या या लेखनातून तो सक्षम नाटककार आहे हे जाणवले. त्याने लेखनात अंतर्भूत केलेली नाटकाच्या सर्व पातळ्यांवर रचलेली, थक्क करणारी प्रायोगिकता पाहून सृजन मन देखील सुखावले. ! एक तरूण सशक्त नाटककार मिळाला याचा आनंद झाला. मला खात्री आहे की भारतीय रंगभूमीला जो बादल सरकार विजय तेंडुलकर आणि डाॅ. गिरीश कर्नाड सारख्या सामर्थ्यवान नाटककारांचा समृद्ध वारसा आहे त्याचा वारसदार होण्याचे एका परिपूर्ण नाटककाराचे सर्व गुण अनिल सरमळकर या तरूण इंग्रजी नाटककारामधे आहेत असा मला विश्वास आहे.

रतन थियाम म्हणजे भारतीय आणि जागतिक रंगभूमीला लाभलेले एक प्रतिभाशाली नाट्यरत्न आहेत.आपल्या मणीपूरी रंगभूमीची व्यापकता त्यांनी पूर्ण जगाला दाखवताना नव्या रंगभूमीचेही आख्यान मांडले त्यानी लिहिलेली नाटके आणि त्यांचे अद्भुत सादरीकरण आणि त्यांनील उत्तुंग अर्थपूर्णता त्यातील रंग आणि प्रकाशाचे अर्थनिर्णयन त्यातील वेधकता आणि दिपवून टाकणारी भव्य दृष्यात्मकता सारेच श्रेष्ठ दर्जाचे ! भारतीय रंगभूमीला जागतिक पातळीवर स्वताचे अढळ स्थान प्राप्त करुन देण्याचे अद्वितीय कार्य रतन थियाम यांनी केले आहे.

अनिल सरमळकर यांनी लिहिलेली द फाॅक्स , इटस् ऑलरेडी टुमाॅरो, ॲरिस्टल ब्रेक अप, व्हल्चर व्हिस्पर्स ही इंग्रजी नाटके रतन थियाम यांनी वाचल्यानंतर प्रभावीत होवुन त्यांनी अनिल सरमळकर हा तरूण नाटकार बादल सरकार,विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड या सारख्या श्रेष्ठ भारतीय नाटकारांचा सशक्त वारसदार ठरेल असे उद्गार काढले आहेत.

दरम्यान अलिकडेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपुर यांनीही अनिल सरमळकर यांच्या लेखनाचे कौतुक करताना ' सर्वच कलांचे टोकाचे व्यवसायिकीकरण होत असताना आणि रंगभूमीही सपक होत असताना अनिल सरमळकर यांचे हे नाट्यलेखन दर्जेदार वेगळे आहेच पण हे लेखन आज महत्वाचे आहे असा अभिप्राय दिला होता .

दरम्यान The fox या नाटकाला देश परदेशातून वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कलावंत लेखक दिग्दर्शक समीक्षक विचारवंत The fox चा गौरव करत असुन अमेरिका व इंग्लंड येथील प्रतिष्ठित विद्यापीठांतही हे नाटक पोहोचले आहे . दरम्यान या नाटकाची पहिली भारतीय आवृत्ती संपली असुन लवकरच The fox ची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.

त्याचप्रमाणे The fox या नाटकाची त्रिनाट्यधारा प्रकाशित होणार असुन या ' ट्रायॉलॉजी ' मधील दुसरा भाग असणारे अनिल सरमळकर यांचे
' Its Already Tomorrow '
हे नाटक लवकरच प्रकाशित होइल तर तिसरा भाग असणारे ' Vulture Whisperes ' हे नाटक त्यानंतर प्रकाशित होणार असल्याचे नाटककार अनिल सरमळकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!