संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक शिवराज चव्हाण यांच्याकडून नागरीकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक व वाढत्या तक्रारींची जिल्हा वंचित प्रशासनाने गंभीर दखल घेतली. पुरवठा निरीक्षक यांना आता संजय गांधी योजना विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
देवगड तालुक्यातील चाफेड, साळशी व अन्य गावातील नागरिकांनी देवगड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप करत, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आवाज उठवून लाक्षणिक उपोषण देवगड तहसीलदार कार्यालय समोर केले होते. देवगड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष साळसकर नेतृत्वाखाली रास्त दर धान्यापासून असलेले अन्यायग्रस्त लाभार्थ्यांसह उपोषणात सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे विजयदुर्ग येथील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख गणेश कीर हे उपोषणाला बसले होते.
उपोषणकर्त्यांशी देवगड तहसीलदार तथा परिक्षावधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांनी भेट देऊन चर्चा केली व आपल्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे रास्त दराच्या धान्या वंचित असलेल्या लाभार्थ्यानाही न्याय देण्यात येईल असे सांगितले. लेखी पत्र देऊन यांच्या उपोषण स्थगित करुन प्रशासनाला सहकार्य करायची विनंती केली. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व लाभार्थी यांनी तहसीलदार यांचे विनंतीला मान देऊन उपोषण स्थगित केले.
विजयदुर्ग येथील गणेश कीर यांनी पुकारलेल्या उपोषणाला तहसीलदार तथा परीक्षावधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांच्या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने तात्काळ घेऊन लेखी पत्र सायंकाळी रवाना करून पुरवठा निरीक्षक यांना संजय गांधी योजना योजनेत पदभार देण्यात आला आहे.