कुवळे माध्यमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुवळे माध्यमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी अध्यक्ष विजयकुमार कदम अध्यक्षतेखाली संपन्न झाला.शाळा म्हणजे सर्वोत्तम संस्कार मंदिर आहे. या मंदिरातून ज्ञान, संस्कार व चांगले विचार घेऊन विद्याथ्र्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करून नावलौकिक मिळवावा. तुम्ही मिळविलेला नावलौकिक इतरांनाही ऊर्जा देणारा ठरेल, असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडावावे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे कृतज्ञतापूर्वक मागे वळून पाहावे, असे मार्गदर्शन कुवळे येथे विजयकुमार कदम यांनी केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विजयकुमार कदम म्हणाले, यशोशिखर सर करता येते. व्यक्तिमत्त्व विकास घडण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. ध्येय निश्चिती करून अहोरात्र कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी ऊर्जा निर्माण केली पाहिजे. स्वतः घडत असताना दुसऱ्यांनाही घडवा. आपल्यातील कृतज्ञता प्रदर्शित व्हावी त्यातून दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळावी. आदर्श नागरिक म्हणून जबाबदारीने वागताना इतरांचाही मानसन्मान ठेवला पाहिजे असे मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विज्ञान प्रदर्शन, मुं वनौषधी प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, रांगोळी य स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान माजी विद्यार्थी आशीर्वाद चव्हाण याने शाळेला ४८ हजारांचा डेस्कटॉप व लॅपटॉप भेट म्हणून दिला, त्याचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कुवळे- रेंबवली सरपंच सुभाष कदम, उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, भरणी सरपंच अनिल बागवे, शाळा समिती सदस्य हेमंत देसाई, सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विष्णू परब, शिक्षक- पालक संघाचे अजय कदम, चंद्रशेखर घाडी, वीणा परब, एकनाथ सावंत, राजा दहिबांवकर, दीपक बागवे, लक्ष्मण बागवे, मुख्याध्यापक संतोष साटम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लाड यांनी केले. आभार श्रीनिवास रावराणे यांनी मानले.