विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील त्रिंबक बौध्द विकास मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत नवनिर्वाचित सरपंच किशोर त्रिंबककर तसेच ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, आशिष बागवे, संतोषी सावंत, सुचिता घाडीगांवकर, सागर चव्हाण, सपना तेली, रोहित त्रिंबककर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष विवेक(गोट्या)जाधव, सचिव गणेश जाधव, मुंबई मंडळ जेष्ठ सल्लागार दत्ता पवार, श्रीकांत जाधव, गोविंद पवार, प्रतिष्ठित व्यक्ती संजय वेंगुर्लेकर, एकनाथ घाडीगांवकर, अशोक बागवे, राजू त्रिंबककर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष घाडीगांवकर, प्रमोद बागवे, अनिल लब्दे, विलास लोके, एकनाथ शेडगे, संतोष साटम, नागेश साटम, विजय सावंत, मंडळाचे सर्व सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.