वन्यजीवांचा हक्काचा अधिवास जपण्याचे केले आवाहन
बांदा |राकेश परब : कोकणात प्रचंड जैवविविधता आहे. परंतु वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही. सद्याच्या दगादगीच्या जीवनात माणसांला फारसा वेळ नसल्याने माणूस वनजीवांच्या माहीतीपासून दुर ओढवत चालला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठीच तसेच वन्य जीवाचे रक्षण होण्यासाठी, नवीन युवा पीढीला आनंद घेण्यासाठी या ‘वन्यजीव सप्ताह’ १ ते ७ आक्टोंबर निमित्ताने साजरा करण्यात येत असल्याचे बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी सांगितले. बांदा वनपरिमंडळ अंतर्गत तांबुळी ग्रामपंचायत येथे शनिवारी ‘वन्य जीव सप्ताह’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांना वनवन्य जिवांबद्दल माहिती मेस्त्री बोलत होते.
जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा, ज्यामुळे त्यांच्या बद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा असे तांबुळी सरपंच अभिलाष देसाई यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच तांबुळी अभिलाष देसाई,बांदा वनपाल अनिल मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ, सर्व वन कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सरपंच देसाई यांनी आभार मानले.