मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या हडी येथील रहिवासी सौ. सुचिता रावजी सुर्वे यांचे आज २३ जानेवारीला दुपारी मालवण येथील खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान,अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.
सुर्वे राईस मिल व ऑईल मिलचे मालक,माजी उपसरपंच ,गणेश मंदीर ट्रस्ट हडी अध्यक्ष व सुप्रसिद्ध भजनी बुवा रावजी एकनाथ सुर्वे यांच्या त्या पत्नी तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुप्रसिद्ध भजनी बुवा भावेश सुर्वे यांच्या त्या काकी होत.
सौ.सुचिता रावजी सुर्वे यांच्या निधनाने हडी व परिसरात शोक व्यक्त होत आहे.