मालवण तालुक्यात वायंगणी गावातील लोकांनी घेतली या योजनेची माहिती…
आचरा |विवेक परब : आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी कार्यालयाच्या वतीने मोफत 7/12 योजनेचा शुभारंभ वायंगणी सरपंच सौ. संजना सचिन रेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तलाठी व्हि.व्हि.कंटाळे यांनी लोकांना या योजनेची माहिती सांगितली व खातेदारांना मोफत 7/12 योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम परब, बाप्पा वायंगणकर, रामदास प्रभू, देऊलकर, उदय मुणगेकर तसेच बहुसंख्य खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.