बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिंगणे येथील श्री देवी माऊली पंचायतनातील परिवार देवतांचा तत्वोत्तारण विधीचे आयोजन रविवार २२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी ९ वाजता देवता प्रार्थना, प्रायश्चित्त विधी, यजमानांची शरीरशुध्दी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, मुख्य देवता स्थापन, परिवार देवतांचे पुजांग तत्वोत्तारण विधी, अग्नीस्थापन, वास्तुदेवता, ब्रम्हादीमंडळ देवता नवग्रह, मुख्य देवतांचे हवन, तत्वहोम, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक, आरती, देवता प्रार्थना आशिर्वाद हे कार्यक्रम होतील.
त्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्ष राजेंद्रकुमार सावंत, सचिव देवदास सावंत, खजिनदार संदेश सावंत व डिंगणे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.