युग्धाचे होतेय सर्व स्तरांतून अभिनंदन
बांदा |राकेश परब : जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिची सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
चालूवर्षी ११आँगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया म्हणून नवोदयची प्रवेश परीक्षा घेतली जाते.ही परीक्षा इंग्रजी ,हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येते.
मनुष्यबळ विकास मंत्रालय मार्फत राबविल्या जात असलेल्या या विद्यालयात सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे शिक्षण मिळते. युग्धाला मुख्याध्यापिका सरोज नाईक ,वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत ,पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,रुईजा गोन्सलवीस, रसिका मालवणकर ,वंदना शितोळे , रंगनाथ परब,जे.डी.पाटील , जागृती धुरी,प्राजक्ता पाटील ,शितल गवस व पालकांचे मार्गदर्शन मिळाले. युग्धाने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,सरपंच अक्रम खान , केंद्रप्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.