31 C
Mālvan
Saturday, March 22, 2025
IMG-20240531-WA0007

बांदा शहरातील ‘त्या’ उपद्रवी माकडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी….!

- Advertisement -
- Advertisement -

ग्रामस्थांच्या मागणीला वनविभाग अधिकार्यांनी दिले सकारात्मक आश्वासन

बांदा | राकेश परब : गेल्या एक वर्षापासून बांदा शहरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास वनविभागाला अपयश येत आहे. परिणामी बांदा शहरातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.
कट्टा कॉर्नर येथे दोन दिवसांपूर्वी सुजाता फोटो स्टुडिओचे केलेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांसह अन्य ग्रामस्थांनी ‘त्या’ उपद्रवी माकडाबाबत हकिकत सांगितली. यावेळी वनरक्षक श्री. देसाई उपस्थित होते.
वनपाल मेस्त्री म्हणाले की, तो माकड जखमी असण्याची शक्यता आहे. शहरात केलेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्यासंदर्भात तसा जीआर नसून पंचनाम्याचा अहवाल प्रशासनास सादर करणार आहोत. काही ग्रामस्थांनी सांगितले की, अनेकदा गाड्यांचे आरसे, सीट मोडणे, पिशव्या पळविणे किंवा घरात घुसून नासधूस करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्या उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे व नागरीकांचे नुकसान टाळावे अशी मागणी त्यांनी केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ग्रामस्थांच्या मागणीला वनविभाग अधिकार्यांनी दिले सकारात्मक आश्वासन

बांदा | राकेश परब : गेल्या एक वर्षापासून बांदा शहरात धुमाकूळ घालत असलेल्या 'त्या' उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास वनविभागाला अपयश येत आहे. परिणामी बांदा शहरातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 'त्या' उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.
कट्टा कॉर्नर येथे दोन दिवसांपूर्वी सुजाता फोटो स्टुडिओचे केलेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांसह अन्य ग्रामस्थांनी 'त्या' उपद्रवी माकडाबाबत हकिकत सांगितली. यावेळी वनरक्षक श्री. देसाई उपस्थित होते.
वनपाल मेस्त्री म्हणाले की, तो माकड जखमी असण्याची शक्यता आहे. शहरात केलेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्यासंदर्भात तसा जीआर नसून पंचनाम्याचा अहवाल प्रशासनास सादर करणार आहोत. काही ग्रामस्थांनी सांगितले की, अनेकदा गाड्यांचे आरसे, सीट मोडणे, पिशव्या पळविणे किंवा घरात घुसून नासधूस करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्या उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे व नागरीकांचे नुकसान टाळावे अशी मागणी त्यांनी केली.

error: Content is protected !!