25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

महावितरणचे कर्मचारी आजपासून ७२ तास संपावर.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : वीज मंडळातील विविध विभागांच्या खासगीकरणाविरोधात महावितरण कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध तीस संघटनांनी बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून तीन दिवसांचा संप घोषित केला आहे. या संपामध्ये महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून ७२ तास संपावर जाणार असून ग्राहक, नागरिकांनी तीन दिवस संपकाळात वीजपुरवठा ठप्प झाल्यानंतर अडचणींना सामोरे जाण्याकरिता आवश्यक पूर्वतयारी ठेवावी, असे आवाहन केले आहे.

याबाबत कर्मचाऱ्यांच्यात संघटनांच्या वतीने संपाबाबत दिलेल्या इशाऱ्यानुसार महावितरणचा परवाना अदानी समूहाला देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून वीज मंडळातील विविध विभागांत खासगीकरण करण्याचा सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार वितरणाचा परवाना अदानी समूहाला दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांसह वीज मंडळाचे मोठे नुकसान होणार आहे. या खासगीकरणाविरोधात मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापूर्वी कर्मचारी संघटनेने शासनाला जाग आणण्यासाठी गेले पंधरा दिवस विविध मार्गाने आंदोलने केली होती. मात्र, त्याबाबत शासनाकडून योग्य दखल घेतली न गेल्याने तीन दिवसांचा संपाचा इशारा देण्यात आला असून त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर हा संप पुढे कायम सुरू ठेवण्याची भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.

संप कालावधीत विद्युत पुरवठा अडचणी निर्माण झाल्यास अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. मात्र, ग्राहक नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना करून ठेवावी, असे आवाहनही संपाचा इशारा देणाऱ्या कर्मचारी संघटनेने केले आहे.

कायमस्वरुपी वीज पुरवठा ठेवण्यासाठी तयारी.

महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांच्या संपाचा इशारा दिला आहे. मात्र, अशा स्थितीत राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी सर्व परिमंडळ व मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत व ते चोवीस तास सुरू राहाणार आहेत. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. रजेवर असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणतर्फे वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरू रहावा, यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!