बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा उपसरपंचपदी भाजपचे सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य कृष्णा उर्फ बाळू गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच उदय चिंदरकर यांनी आज सोमवारी पदाचा कार्यभार स्विकारला. सर्वांना सोबत घेऊन भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मडुरा सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे यावेळी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य अमोल मेस्त्री, सचिन जाधव, समीेर बुगडे, रेश्मा परब, पल्लवी सातार्डेकर, संचिता धुरी, स्वप्नाली परब, मीरा प्रभू, ग्रामस्थ सोमनाथ परब, दिलीप परब, दाजी सातार्डेकर, परेश परब, नाना परब, राजाराम केरकर, सानिका गावडे, ग्रामसेविका श्रीमती गवस उपस्थित होते.