बांदा | राकेश परब :
इन्सुली कुडवटेंब येथील ज्ञानदेव दत्ताराम केरकर वय ८६ यांचे राहत्या घरी सोमवारी निधन झाले. इन्सुली परीसरातील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. सुरुवातीला ते इंडियन नेव्ही मध्ये होते त्यानंतर काही वर्षे त्यांनी गोव्यात शिक्षक म्हणून काम केले. त्यांना शेतीची आवड होती. विद्या विकास मंडळ इन्सुलीचे सचिव विकास केरकर, तर आर टी ओ मधील कर्मचारी संजय केरकर यांचे वडील तर नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या मुख्याध्यापिका सौ विद्या केरकर याचे सासरे होत. त्यांच्या पश्चात सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.