23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘गणपती साना धबधबा’ बनणार कणकवलीच्या पर्यटन विकासाची बारमाही खळाळती गंगा..!

- Advertisement -
- Advertisement -

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याला यश.

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या ‘गणपती साना’ येथील बारमाही धबधब्याच्या कामाला अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याने २ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कणकवलीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून कणकवली गणपती साना या ठिकाणी कणकवलीच्या पर्यटन विकासात मोठी भर टाकणारा हा प्रकल्प करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात काही कारणाने या कामाला निधी मंजूर झाला नाही. व त्यानंतर हे विकास काम प्रलंबित राहिले.

कणकवली शहर विस्तारत असतानाच कणकवली शहरातील पर्यटन वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कणकवली गणपती साना येथे जलस्त्रोतांचे सौंदर्यकरण करणे या अंतर्गत धबधबा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
यामुळे कणकवलीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात अन्य धबधब्या ऐवजी बारमाही हा धबधबा उपलब्ध व्हावा व यातून कणकवलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर धरून हा हे काम प्रस्तावित करण्यात आले होते.

गेली दोन वर्षाहून अधिक काळ हे काम प्रलंबित राहिले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांचे नुकतेच या प्रश्नी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे याबाबत लक्ष वेधत पाठपुरावा करून या कामाकरिता तातडीने निधी मंजूर करून देत प्रशासकीय मान्यता देखील मिळवून दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले असून, कणकवली शहराच्या पर्यटन विकासाची खळाळती व बारमाही गंगा साकार व्हायचे हे काम आता मंजूर झाले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याला यश.

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या 'गणपती साना' येथील बारमाही धबधब्याच्या कामाला अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याने २ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कणकवलीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून कणकवली गणपती साना या ठिकाणी कणकवलीच्या पर्यटन विकासात मोठी भर टाकणारा हा प्रकल्प करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात काही कारणाने या कामाला निधी मंजूर झाला नाही. व त्यानंतर हे विकास काम प्रलंबित राहिले.

कणकवली शहर विस्तारत असतानाच कणकवली शहरातील पर्यटन वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कणकवली गणपती साना येथे जलस्त्रोतांचे सौंदर्यकरण करणे या अंतर्गत धबधबा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
यामुळे कणकवलीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात अन्य धबधब्या ऐवजी बारमाही हा धबधबा उपलब्ध व्हावा व यातून कणकवलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर धरून हा हे काम प्रस्तावित करण्यात आले होते.

गेली दोन वर्षाहून अधिक काळ हे काम प्रलंबित राहिले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांचे नुकतेच या प्रश्नी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे याबाबत लक्ष वेधत पाठपुरावा करून या कामाकरिता तातडीने निधी मंजूर करून देत प्रशासकीय मान्यता देखील मिळवून दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले असून, कणकवली शहराच्या पर्यटन विकासाची खळाळती व बारमाही गंगा साकार व्हायचे हे काम आता मंजूर झाले आहे.

error: Content is protected !!