संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन भांडुप शाखेच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियाना अंतर्गत भव्य आरोग्य शिबीर दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री दत्त सेवा मंडळ, कासार्डे भोगरे पारकर वाडी, तालुका कणकवली येथे संपन्न झाला.
शिबिराचे उद्घाटन श्री दत्त सेवा मंडळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिराला अनेक लोकांनी उपस्थित राहून विविध आजारांवर डॉक्टरांकडून सल्ला घेतला. शिबिरामध्ये डॉ. संदिप साळी, डॉ. विशाल नलावडे, डॉ. शाम राणे, डॉ.नेमिनाथ खोत, डॉ.पूनम जगदाळे या सर्व डॉक्टरांचे सहकार्य लाभले. तसेच श्री दत्त सेवा मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.
जीवनविद्या मिशनच्या वतीने अनेक वेगवेगळे अभियान राबविले जातात. त्यातील एक म्हणजे ग्रामसमृद्धी अभियान. ग्रामसमृद्धी अभियानातून गावाचा विकास केला जातो. गावात अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच विद्यार्थी, तरुण मुले, यांना मार्गदर्शन, कौटुंबिक मार्गदर्शन केले जाते व गावाचा सर्वांगीण विकास अगदी विनामूल्य केला जातो.