विवेक परब | चिंदर : चिंदर सडेवाडी मठ येथे ‘आत्मा’ अंतर्गत काजू पीक शेतीशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काजू रोप लागवडी पासून रोग व बीज प्रक्रिये पर्यंत कृषी सहाय्यक सुनिल कदम, तलाठी मेजर माळी यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले.
ही काजू पीक शेतीशाळा दर शुक्रवारी संध्याकाळी घेण्यात येणार असून तज्ञ अधिका-यांन मार्फत मार्गदर्शन देण्यात येणार आहे अशी माहिती श्री कदम यांनी दिली.
यावेळी मोरेश्वर गोसावी, स्वप्निल गोसावी, प्रतिख मुळये, लाडोबा घागरे, मेघश्याम गोसावी, हेमंत गोसावी व इतर काजू शेतकरी उपस्थित होते.