मालवण | वैभव माणगांवकर : अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मालवणचे नगरसेवक श्री दीपक पाटकर यांनी एक कृतीने एक पाऊल उचलले आहे. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरानजीकच्या देऊळवाडा-आडवण या रस्त्याच्या धोकादायक वळणावर होत असलेले अपघात लक्षात घेऊन मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांनी सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने त्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसविला असून यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी झाली आहे
मालवण देऊळवाडा येथून सातेरी मंदिर जवळ राहणाऱ्या नागरिकांना तसेच आडवण भागातील नागरिकांना ये जा करताना या वळणावरून येणारे वाहन दिसत नव्हते त्यामुळे बहुतांश वेळा हे वळण अपघातास कारणीभूत ठरत होते ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्वखर्चाने कॉन्वेक्स मिरर बसविला.
यावेळी नगरसेवक आपा लुडबे, नगरसेवक जगदीश गावकर, रवी मालवणकर, सुमेध पुराणिक, बाळू आचरेकर, शिवाजी म्हापणकर, अरविंद मराळ, अशोक मराळ, उमेश रानडे, जितू मराळ ,प्रमोद मराळ, बाबू गावकर, सुहास वालावलकर, व इतर उपस्थित होते.