समिती अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती
मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत ४१ नव्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली आहे.
कोरोना काळात ज्या मुलांचे आई-किंवा वडील मयत झाले आहेत. किंवा ज्या महिलांचा पती मयत झाला आहे. अश्या विधवा स्त्रियांना या योजनेत सहभागी करण्यात आले आहे. यासोबत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ व ब) या योजनेतही लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांचा मंदार केणी यांच्या नेतृत्वाखालील या समितीच्या माध्यमातून २५० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेत सहभागी करण्यात आले आहे. तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार व अन्य कर्मचारी यांच्या सहकार्यातून व समिती सदस्य यांचा गावागावातील पाठपुरावा व सेवाभावी कार्यातून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देणे शक्य होत असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.
नव्याने समावेश झालेल्या लाभार्थ्यांना पुढील महिन्या पासून या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.