मुंबई | ब्युरो न्यूज : मुंबईतल्या प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील ‘श्री’च्या मूर्तीला बुधवार १४ डिसेंबरपासून रविवार १८ डिसेंबर पर्यंत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून श्रींच्या प्रतिमेचे दर्शन दिले जाणार आहे. सिंदूर लेपन पूर्ण झाल्यानंतर सोमवारी १९ डिसेंबर दुपारी १ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून भाविकांना गणरायाचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून देण्यात आली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -