26.2 C
Mālvan
Tuesday, March 18, 2025
IMG-20240531-WA0007

देशातील सहकार क्षेत्रात जिल्हा बँक अग्रगण्य राहील : सतीश सावंत

- Advertisement -
- Advertisement -

जिल्हा बँकेचा २०२०-२१ सालासाठी ऑडिट वर्ग”अ”;२९ सप्टेंबर रोजी ३८ वी सर्वसाधारण सभा

कणकवली / उमेश परब : जिल्हा बँक कोविड कालावधी असतानाही नफा वाढत आहे.त्याचा फायदा बँकेच्या लाभांश संस्थांना होत आहे.बँकेची व्यवसाय उलाढाल ५ हजार कोटींकडे चालली आहे.सन २०२०-२१ मध्ये लेखा परीक्षण बँक ऑडिट वर्ग “अ” प्राप्त झालेला आहे.शेतकरी व सर्व सामान्य लोकांसाठी विविध कर्ज योजना बँकेने आणल्या आहेत.त्यामुळे देशातील सहकार क्षेत्रात सिंधुदुर्ग बँक अग्रगण्य राहील.आज पर्यंत बँकेवर कोणालाही एकही आरोप करता आला नाही,तशीच कामगिरी पुढील काळात जिल्हा बँक करेल.सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची उद्या २९ सप्टेंबर रोजी ३८ वी सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

कणकवली येथील जिल्हा बँक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँक संचालक आर.टी.मर्गज व बँक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बँक संचालक व प्रशासनाने जे काम केले त्याला यश आले आहे.राज्यात नावारुपास बँक आली आहे,सातारा व अकोला बँकेने आमचे काम पाहिले,१५ लाख कर्ज देण्याचे अधिकार बँक व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील बँकिंग व्यवसायातील ३९ टक्के बँक व्यवसाय झाला आहे.स्व निधी २७० कोटी आहे,५ हजार कोटींकडे व्यवसाय वाटचाल झाली आहे.सी.डी.रेशो ६७.९२ टक्के झाला आहे.बँकेला ६२ कोटी ९२ लाख ढोबळ नफा तर निव्वळ नफा१४ कोटी झाला आहे,असे सतीश सावंत यांनी सांगितले.

बँकेने सातबारा व अत्याधुनिक सेवा,गट सचिव साठी विमा संरक्षण,कोविड अनाथ बालक ११ मुलांना लाभ दिला.खावटी कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तसेच मंगलमूर्ती वाहन कर्ज योजना ९ टक्के दराने तर ६ टक्के दराने कर्ज तोक्ते वादळ,अन्य नुकसान झालेल्या दुकानदार व अन्य लोकांना देत आहोत.शेतकरी मुलांना जांचे चांगले मेरिट आहे,त्यांना बँकेने स्व निधीतून व्याज परतावा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.अभिमान वाटेल असा कारभार आम्ही केला आहे,असं सतीश सावंत यांनी सांगितले.

त्यामुळे उद्याच्या सर्व साधारण सभेला संस्थांच्या प्रतिनिधींनी सूचना उपस्थित राहून कराव्यात.रिझर्व्ह बँकेच्या लाभांश १५ टक्के सर्व संथना देण्यात येणार आहे.भविष्यात जिल्ह्यातील सीडी रेशो वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.तीन चार दिवसांत नवीन योजना चालू होणार आहेत.११७७ भागधारक संस्थानी उपस्थित राहून सहकार्य करावे.ही सभा शरद कृषी भवन सर्व कोविड नियम पाळून घेतली जाणार आहे.५ ते ६ हॉलमध्ये ही बैठक व्यवस्था प्रशासनाने केली आहे,तरी सर्वानी उपस्थित रहावे,असे आवाहन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!