जागतीक स्वेच्छिक रक्तदान दिनानिमित्त मालवणात रक्तदान शिबीर
वैभव माणगांवकर | मालवण : कोविड महामारीनंतर देशातील रुग्णालयातील रुग्णांना रक्तपुरवठेची गरज ही अत्यावश्यक गरज आहे हे अनेक सिद्ध झाले.1 ऑक्टोबर रोजी ‘ जागतीक स्वेच्छिक रक्तदान दिन ‘ जगभर साजरा केला जात असून या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण आणि एकता मित्रमंडळ मालवण यांनी ” रक्तदान करुया व माणुसकी जपुया ” या विचाराद्वारे दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. मालवण बाजारपेठेतील कासारव्हाळी नजिकच्या देसाई बिल्डिंग येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराची वेळ 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत असल्याची माहिती एकता मित्रमंडळाचे श्री .अमेय देसाई (9404535273) आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री उमेश सांगोडकर (9421237832) यांनी दिली आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी सदर वरील दोनही भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता यायची सोयही करण्यात आली आहे.
शासकीय नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात सर्वांनी स्वेच्छेने रक्तदान करायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ग्लोबल रक्तदाते मालवण यांनीही या उपक्रमाला विशेष सहकार्य केले आहे.