संतोष साळसकर | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील भरणी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासह ७ सदस्य श्री देव स्थानेश्वर, पावणादेवी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आले. ग्रामविकास पॅनेलच्या विरोधात उभे केलेल्या भाजप पुरस्कृत उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख अनिल बागवे यांनी केला.
ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदासाठी अनिल यशवंत बागवे तर सदस्य म्हणून वॉर्ड नं. १(तांबळवाडी – बौध्दवाडी) मधून प्रविण वामन जगताप, लक्ष्मी शिवाजी जगताप, मनीषा मोहन तांबे, वॉर्ड नं. २ (घाडीवाडी- लाडवाडी) मधून प्रशांत प्रकाश घाडीगावकर, राधिका दत्तात्रय पाटकर, वॉर्ड नं. ३ (तळेवाडी गावठणवाडी ) मधून अक्षय बाळकृष्ण गुरव, वैदही महेश पुजारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर भाजप पुरस्कृत उमेदवारांमधून सरपंच पदासाठी विद्यमान सरपंच प्रकाश सखाराम घाडी तर सदस्य म्हणून प्रथमेश प्रभाकर गुरव, निलम स्नेहल कुमार तांबे, सुरेश पांडुरंग लाड, प्रकाश सखाराम घाडी यांनी अर्ज दाखल केले होते. या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ग्रामविकास पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे गावाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.