27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणात आनंदव्हाळ उतारावर बस व मारुती सुझुकी अर्टीगा गाडी यांच्यात अपघात..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | वैभव माणगांवकर : मालवण- कसाल मुख्य रस्त्यावरील आनंदव्हाळ येथील नागमोड्या वळणांच्या उतारावर खाजगी बस व मारुती सुझुकी अर्टिगा कार यांच्यात घासाघीस होऊन झालेल्या अपघातात अर्टीगा गाडीच्या पुढील उजव्या दर्शनी भागाचे व चाकाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी तीनच्या सुमारास अपघात घडला.

मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक खासगी बस आनंदव्हाळ येथे आली असता रस्ता अरुंद असल्याने बस चालकाने बस रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच मालवणच्या दिशेने येणाऱ्या अर्टिगा गाडीला बस घासली गेल्याने अर्टीगा गाडीचे पुढील उजवी कडील चाक तुटून पडले व गाडीच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. सदर अपघाताचे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटविण्यात आल्याचेही वृत्त आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | वैभव माणगांवकर : मालवण- कसाल मुख्य रस्त्यावरील आनंदव्हाळ येथील नागमोड्या वळणांच्या उतारावर खाजगी बस व मारुती सुझुकी अर्टिगा कार यांच्यात घासाघीस होऊन झालेल्या अपघातात अर्टीगा गाडीच्या पुढील उजव्या दर्शनी भागाचे व चाकाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी तीनच्या सुमारास अपघात घडला.

मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक खासगी बस आनंदव्हाळ येथे आली असता रस्ता अरुंद असल्याने बस चालकाने बस रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच मालवणच्या दिशेने येणाऱ्या अर्टिगा गाडीला बस घासली गेल्याने अर्टीगा गाडीचे पुढील उजवी कडील चाक तुटून पडले व गाडीच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. सदर अपघाताचे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटविण्यात आल्याचेही वृत्त आहे.

error: Content is protected !!