मालवण | वैभव माणगांवकर : कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी आज ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक उपोषण मालवण बाजारपेठ येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्यासमोर करण्यात आले.
सदर लाक्षणिक उपोषण मुख्यत्वेकरून नोकर भरतीच्या मागणीसाठी केले आहे. गेली अनेक वर्षे मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत. यामुळे उर्वरित कर्मचारी आहेत त्यांच्यावर सर्व कामाचा भार असल्याने स्वतःच्या आजारपणासाठी देखील सुट्टी घेता येत नाही. बँकेच्या १२७१ शाखा यामध्ये एकही सफाई कर्मचारी नाही, ६९८ शाखांमध्ये एकही शिपाई नाही, ४४८ शाखांमध्ये दोन सफाई कर्मचारी तसेच शिपाई नाही, ५५ शाखांमध्ये एकही क्लार्क नाही, ७२९ शाखांमध्ये फक्त एक क्लार्क आहे तर ६६८ शाखांमध्ये फक्त दोन क्लार्क आहेत. यामुळे शिल्लक कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. यामध्ये सरकारने बँकेमार्फत जनधन, अटल पेंशन, मुद्रा, स्वाधिनी, विमा योजना अनुदानाचे वाटप राबविले याचा ताण व कामाचा तणाव बँकेतील कर्मचारी वर्गावर पडत आहे अशा विविध मागण्यांसाठी आज कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले.