ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन (सिंधुदुर्ग ) व लायन्स आय हाॅस्पिटल नेत्रालय (कणकवली ) यांचा संयुक्त उपक्रम.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस येथे यंदा १० डिसेंबर दिवशी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिंधुदुर्ग ) व लायन्स आय हाॅस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या सयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत सुरेश सदाशिव पेडणेकर (नांदोस-सोनारवाडी) यांच्या घरी, मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. लाभ घेणार्यांना मोतीबिंदू ऑपरेशन्स लेन्स बसवणे आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील.
‘फेको तंत्रज्ञानाद्वारे’ बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियातिरळेपणा व बाल नेत्रोपचार, अचूक चष्मा नंबर, शस्त्रक्रिया पूर्वक सखोल तपासणी व्यवस्था, बाह्यपटल व अंतरपटल शस्त्रक्रिया विशेष नेत्र तज्ञांकडून करण्यात येईल. नोंदणी संपर्कासाठी सौ. संजना गावडे श्री उल्हास सावंत ( ८०१०५२६६४२), सौ. मिनल पार्टे( ९३७२६८८६५७ ), श्री. रितेश सावंत( ९३५६६७४८०५ ),
यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करावी असे आवाहन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ( सिंधुदुर्ग ) मालवण अध्यक्ष श्री. सुधीर धुरी, तालुका सचिव श्री. राजेशकुमार लब्दे, मालवण तालुका संघटक श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.