28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पर्यटन विकासासाठी सर्व समाज घटकांनी एकत्रीत प्रयत्न करायचे मालवण तहसीलदारांचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -

मालवण तहसीलदार माननीय अजय पाटणे यांचे पर्यटन दिनादिवशी मार्गदर्शनपर विचार…

मालवण |वैभव माणगांवकर : मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन संघटीत प्रयत्न केले पाहिजेत.अतिथी देवो भव ही भावना आपण सर्व घटकांनी जोपासली पाहिजे, असे आव्हान मालवण तहसीलदार श्री. अजय पाटणे यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील पर्यटन सप्ताहाच्या उद्घाटन केले.

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी कक्षाच्या वतीने 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधी मध्ये पर्यटन सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज जागतिक पर्यटन दिनाच्या प्रसंगी या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी श्री. अजय पाटणे यांनी पर्यटनात नवीन प्रयोग करण्याची आवश्यकता मांडली. तसेच हा पर्यटन सप्ताहाचा अभिनव उपक्रम कॉलेजने सुरू केल्याबद्दल प्राचार्यांचे अभिनंदन केले, तसेच सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केले गेले.

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांनी अध्यक्षीय भाषणात मालवण शहरात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यापासून झालेले विविध बदल नमूद करत, शासनाने पर्यटन व्यवसायास अधिक पाठबळ देण्याची गरज आहे,असे मत मांडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय भरभराटीस आणण्यामध्ये मा. खासदार श्री. नारायण राणे यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी मांडले.

पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून,पर्यटन विषयक धोरणाची चर्चा व्हावी, शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाची कास धरावी, अधिकाधिक विद्यार्थांना पर्यटन व्यवसायास आवश्यक कौशल्ये प्राप्त व्हावीत आणि त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात, हे पर्यटन सप्ताहाचे उद्देश प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.

आय. क्यू. ए. सी. कक्षाचे समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले. यावेळी कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तहसीलदार श्री. अजय पाटणे यांचा सत्कार करण्यात आला.

या पर्यटन सप्ताहात महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या वतीने अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रा. शंकर खोबरे यांनी आजची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, डॉ. एम. आर.खोत यांनी 28 सप्टेंबरचे सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता अभियान, ग्रंथपाल प्रा. संग्रामसिंह पवार यांनी 30 सप्टेंबर रोजी होणारी ऑनलाइन प्रश्न मंजुषा, प्रा. कैलास राबते यांनी 2 ऑक्टोबर रोजी ठरलेली ऐतिहासिक स्थळ निवती किल्ला भेट तर डॉ. सुमेधा नाईक यांनी 29 सप्टेंबर रोजी असणारी मालवण तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धा आणि 1 ऑक्टोबर चा नॅशनल वेबिनार इत्यादी कार्यक्रमांची माहिती निवेदन केली. या सर्व उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी डॉ. आर. एन. काटकर यांनी केले तसेच 3 ऑक्टोबरला होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाचे निवेदन केले.

या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य श्री. संदेश कोयंडे, श्री शैलेश सामंत, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव श्री. अमेय देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष श्री. विश्वास गांवकर आणि इतर पदाधिकारी जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण व सौ. गावकर उपस्थित होत्या.मालवण मधील सेवाभावी संस्थांचे सदस्य, पर्यटन व्यावसायिक, महाविद्यालयाचे माजी विदयार्थी, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग इत्यादींच्या मर्यादित संख्येच्या उपस्थितीमध्ये कोविड संबंधित नियमांचे पालन करून महाविद्यालयातील नरहरी झांट्ये सभागृहात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण तहसीलदार माननीय अजय पाटणे यांचे पर्यटन दिनादिवशी मार्गदर्शनपर विचार...

error: Content is protected !!