ह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिंधुदूर्ग )व
श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचा संयुक्त उपक्रम ; लायन्स आय हाॅस्पिटल कणकवलीचे विशेष तंत्रज्ञान सहकार्य .
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथे १० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिंधुदुर्ग ) आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब,
लायन्स आय हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने १० डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत पळसंब शाळा क्र. १ जवळील मुख्य हमरस्त्यावरील ‘आचरेकर घर’ येथे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.
लाभ घेणार्यांना मोतीबिंदू ऑपरेशन्स लेन्स बसवणे आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील. ‘फेको तंत्रज्ञानाद्वारे’ बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियातिरळेपणा व बाल नेत्रोपचार, अचूक चष्मा नंबर, शस्त्रक्रिया पूर्वक सखोल तपासणी व्यवस्था, बाह्यपटल व अंतरपटल शस्त्रक्रिया विशेष नेत्र तज्ञांकडून करण्यात येईल.
नोंदणी संपर्कासाठी श्री . जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत
( ९४२१२६२९८७), सदस्य
श्री . हितेश सावंत
( ८७६७०७९७६५), श्री . वैभव परब ( ९४२०११५८३५),
श्री.अमित पुजारे ( ९४२०४०५९४२)
यांच्याशी संपर्क करून नांव नोंदणी करावी असे आवाहन ह्युमन राईट्स असोशियशन फॉर प्रॉटेक्शन ( सिंधुदुर्ग ) मालवण अध्यक्ष श्री सुधीर धुरी, तालुका सचिव राजेशकुमार लब्दे, मालवण तालुका संघटक श्री चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.