दिंडेजत्रेनिमित्त ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वैभवशाली अशी धार्मिक परंपरा असलेल्या चिंदर गावातील सुप्रसिद्ध श्री. आई भगवती देवी माऊली दिंडे जत्रा बुधवार ७ डिसेंबरला आहे. या निमित्त जत्रेच्या दिवसापासून पुढील पाच दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत.
हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी महती असलेल्या श्री आई देवी भगवतीच्या जत्रोत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा खालील प्रमाणे आहे.
बुधवारी ०७ डिसेंबरला सकाळी ९.०० वा, यात्रेकरू भाविकांचे स्वागत व देवी भगवती दर्शन, दु. १२.०० ते १.०० वा. श्री देवी भगवती माऊलीला मानकरी यांचा महाप्रसाद (नैवेद्य), रात्री ११.०० वा. श्री देव रामेश्वर मंदिर पासून श्री देवी भगवती माऊली मंदिरात ग्रामदेवतांचे (तरंगांचे) ताशा ढोलाच्या वाद्यवृंदाने – तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन.
पहाटे ३ वाजता- पुराण, गोंधळ, किर्तन व दिंडेजत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीचे दिवट्या नृत्य.
गुरुवारी ०८ डिसेंबरला संध्याकाळी ५.३० ते ६.३० श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, देऊळवाडीचे सुस्वर भजन, रात्रौ ६.३० ते ७.३० वा. श्री देव तेरई ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ तेरईचे सुस्वर भजन, रात्री ७.३० ते ८.३० वा. श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, साटमवाडीचे सुस्वर भजन, रात्री ९.०० नंतर- पुराण, गोंधळ, किर्तन व श्रीं ची आरती,
शुक्रवारी ०९ डिसेंबरला संध्याकाळी. ४.०० ते ५.०० वा. श्री सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळचे सडेवाडीचे सुस्वर भजन, संध्या. ५.३० ते ६.३० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकरवाडीचे सुस्वर-भजन, संध्या ६.३० ते ७.३० वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, कुंभारवाडीचे सुस्वर भजन, रात्री ७.३० ते ८.३० वा. श्री देव वाडत्रीब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, कोंड-अपराजवाडीचे सुस्वर भजन, रात्रौ ९ नंतर पुराण, गोंधळ, किर्तन व श्री ची आरती.
शनिवारी १० डिसेंबरला संध्या. ५.३० ते ६.३० वा. श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, लब्देवाडीचे सुस्वर भजन, संध्या. ६.३० ते ७.३० वा. – श्री देवी पावणाई प्रासादिक भजन मंडळ खरिवाडीचे सुस्वर भजन, ७.३० ते ८.३० श्री आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडीचे सुस्वर भजन, भजन पुराण, गोंधळ, किर्तन व श्रीं ची आरती.
रविवारी ११ डिसेंबरला दुपारी ३.०० ते ६.०० वा. – चालू वहिवाटदार सर्व महिला जानकी / किशोरी / रंजना घाडी यांच्या मार्फत आयोजित हळदीकुंकू समारंभ, संध्या ६.०० ते ७.०० वा. श्री देव पिसाळी ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, तेरईचे सुस्वर भजन, रात्रौ ७.०० ते ८.०० वा. – श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ, चिंदर भटवाडीचे सुस्वर भजन,
रात्री १०.०० वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा “पतिव्रता नारी देवांना भारी” हा नाट्य प्रयोग व रात्रौ २.३० नंतर पुराण-गोंधळ-किर्तन व श्री ची आरती दिवट्या नृत्यासहित-लळीत समाप्ती.असे कार्यक्रम होणार आहेत.
सर्व भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बारापाच मानकरी, देणगीदार, हितचिंतक, सर्व ग्रामस्थ व श्री देव भगवती माऊली सेवा समिती, चिंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे.