24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणचा ‘सुपरकाॅप’ सुपुत्र…!

- Advertisement -
- Advertisement -

( पोलिस पदक विजेते अंमलदार सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर वाढदिवस विशेष.)

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर हे विविधतेने नटलेले एक नगर आहे. मालवण शहराला जसा ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा वारसा आहे तसाच इथल्या काही मनुष्य तत्वांना देखील एक वेगळाच वीरतेचा वारसा आहे.
ही वीरता कोणावर अधिकार गाजवायची वृत्ती नसून ती वैयक्तिक जीवन संघर्षाचे एक आपापले माप असते. या वाळुच्या रुपातील मातीतले काही सुपुत्र किंवा त्यांचे जीवन हे एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणेच अविश्वसनीय आहे…तरिही संपूर्ण वास्तव आहे. मालवणच्या एका अशाच अविश्वसनीय जीवन पटाचे नांव आहे पोलिस पदक विजेते अंमलदार ‘सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर पत्ता मेढा मालवण.!’

सादिक या ऊर्दू नावाचा अर्थ विश्वासू, उदार,अनुकूल, सक्षम, सक्रिय, स्वैच्छिक, सर्जनशील असा अतिशय आठही दिशांतील सकारात्मकतेने भारलेला आहे. सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर यांचे जीवन पाहिले तर त्या नावाची प्रचिती अवश्य येईल.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालपण गेल्यानंतर किशोर वयात शिक्षणासोबत किल्ल्यापर्यंत पर्यटकांना वल्हवत होडिने नेणारे सादिक यांच्या हाताचे कित्येकदा कष्टाने भेगा पडून सोलले गेले परंतु कुटुंबाची जाण, पोटाची आग, शिक्षणाची गरज आणि सामाजिक स्तरावर स्वतःला सिद्ध करायचा ध्यास या चतुःसूत्रीला मनाशी घट्ट कवटाळून ते जीवनातील कष्टाची वल्ही चालवत राहीले.
ॲथलेटीक्स व इतर क्रीडा प्रकारातील त्यांच्या प्राविण्यामुळे त्यांची झालेली पोलिस भरती हे आश्चर्य नव्हते परंतु त्यानंतरचा प्रशिक्षणाचा खडतर कालावधी अंमलदार सादिक यांना निश्चितच मालवणचा सुपुत्र ते समाजाचा रक्षक हा वैचारीक बदल शिकवून गेला. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात असताना लेदरबाॅल क्रिकेटचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करताना त्यांच्यातील नेतृत्वगुणांना देखील एक वेगळीच धार चढली होती. बॅड बाॅईज व प्ले बाॅईज या शिस्तबद्ध लेदरबाॅल क्रिकेट संघात युवा सादिक यांची कामगिरी ही उल्लेखनीयच्याही वरची होती. लेदरबाॅल क्रिकेट त्यांना आणखीन मजबूत करुन जात होते.

त्यांच्या पोलिस कारकिर्दीत नांदोस हत्याकांड सारख्या अमानुष प्रकरणाचा त्यांनी, त्यांच्या वरीष्ठांनी व सहकार्यांनी लावलेला छडा देशातील सर्वोच्च पोलिस कामगिरींमधील एक मानला जातो.
आधी सिंधुदुर्ग व सध्या मुंबई पोलिसात कार्यरत असणार्या या ‘सुप्रीम सुपरकाॅप’ चा पोलिस पदक देऊन सन्मान देखील झाला आहे.

आपल्या खडतर रक्षण सेवेत रुजू असताना आपल्या मातृभूमी मालवणमधील पारंपारिक, धार्मिक व मैत्रीच्या धाग्यांचा त्यांना विसर पडत नाही म्हणून सादिक त्यांच्या नांवाप्रमाणेच ‘अनुकूल’ ठरतात.
त्यांचा असा एक वेगळा युवा व ज्येष्ठ चाहता वर्ग देखील आहे. सुपरकाॅपच्या आत असलेल्या अस्सल मालवणी सादीक यांच्यावर तो चाहता वर्ग नेहमीच माया करत आलाय आणि सादिक यांनीही स्वतःच्या पद व प्रतिष्ठेला माणुसकीच्या आड आणू दिलेले नाही हे विशेष..!

पोलिस पदक विजेते अंमलदार सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर यांचा आज वाढदिवस आहे.
आपली सिंधुनगरी चॅनेल समूह व त्यांच्या चाहत्यांतर्फे मालवणच्या या ‘सुपरकाॅप सुपुत्राला’ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढिल सुपर वाटचालीसाठी उचित् सामर्थ्य लाभो या सदिच्छा.

आपली सिंधुनगरी चॅनेल

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

( पोलिस पदक विजेते अंमलदार सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर वाढदिवस विशेष.)

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर हे विविधतेने नटलेले एक नगर आहे. मालवण शहराला जसा ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा वारसा आहे तसाच इथल्या काही मनुष्य तत्वांना देखील एक वेगळाच वीरतेचा वारसा आहे.
ही वीरता कोणावर अधिकार गाजवायची वृत्ती नसून ती वैयक्तिक जीवन संघर्षाचे एक आपापले माप असते. या वाळुच्या रुपातील मातीतले काही सुपुत्र किंवा त्यांचे जीवन हे एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणेच अविश्वसनीय आहे…तरिही संपूर्ण वास्तव आहे. मालवणच्या एका अशाच अविश्वसनीय जीवन पटाचे नांव आहे पोलिस पदक विजेते अंमलदार 'सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर पत्ता मेढा मालवण.!'

सादिक या ऊर्दू नावाचा अर्थ विश्वासू, उदार,अनुकूल, सक्षम, सक्रिय, स्वैच्छिक, सर्जनशील असा अतिशय आठही दिशांतील सकारात्मकतेने भारलेला आहे. सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर यांचे जीवन पाहिले तर त्या नावाची प्रचिती अवश्य येईल.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालपण गेल्यानंतर किशोर वयात शिक्षणासोबत किल्ल्यापर्यंत पर्यटकांना वल्हवत होडिने नेणारे सादिक यांच्या हाताचे कित्येकदा कष्टाने भेगा पडून सोलले गेले परंतु कुटुंबाची जाण, पोटाची आग, शिक्षणाची गरज आणि सामाजिक स्तरावर स्वतःला सिद्ध करायचा ध्यास या चतुःसूत्रीला मनाशी घट्ट कवटाळून ते जीवनातील कष्टाची वल्ही चालवत राहीले.
ॲथलेटीक्स व इतर क्रीडा प्रकारातील त्यांच्या प्राविण्यामुळे त्यांची झालेली पोलिस भरती हे आश्चर्य नव्हते परंतु त्यानंतरचा प्रशिक्षणाचा खडतर कालावधी अंमलदार सादिक यांना निश्चितच मालवणचा सुपुत्र ते समाजाचा रक्षक हा वैचारीक बदल शिकवून गेला. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात असताना लेदरबाॅल क्रिकेटचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करताना त्यांच्यातील नेतृत्वगुणांना देखील एक वेगळीच धार चढली होती. बॅड बाॅईज व प्ले बाॅईज या शिस्तबद्ध लेदरबाॅल क्रिकेट संघात युवा सादिक यांची कामगिरी ही उल्लेखनीयच्याही वरची होती. लेदरबाॅल क्रिकेट त्यांना आणखीन मजबूत करुन जात होते.

त्यांच्या पोलिस कारकिर्दीत नांदोस हत्याकांड सारख्या अमानुष प्रकरणाचा त्यांनी, त्यांच्या वरीष्ठांनी व सहकार्यांनी लावलेला छडा देशातील सर्वोच्च पोलिस कामगिरींमधील एक मानला जातो.
आधी सिंधुदुर्ग व सध्या मुंबई पोलिसात कार्यरत असणार्या या 'सुप्रीम सुपरकाॅप' चा पोलिस पदक देऊन सन्मान देखील झाला आहे.

आपल्या खडतर रक्षण सेवेत रुजू असताना आपल्या मातृभूमी मालवणमधील पारंपारिक, धार्मिक व मैत्रीच्या धाग्यांचा त्यांना विसर पडत नाही म्हणून सादिक त्यांच्या नांवाप्रमाणेच 'अनुकूल' ठरतात.
त्यांचा असा एक वेगळा युवा व ज्येष्ठ चाहता वर्ग देखील आहे. सुपरकाॅपच्या आत असलेल्या अस्सल मालवणी सादीक यांच्यावर तो चाहता वर्ग नेहमीच माया करत आलाय आणि सादिक यांनीही स्वतःच्या पद व प्रतिष्ठेला माणुसकीच्या आड आणू दिलेले नाही हे विशेष..!

पोलिस पदक विजेते अंमलदार सादिक इब्राहीम ख़ान मुज़ावर यांचा आज वाढदिवस आहे.
आपली सिंधुनगरी चॅनेल समूह व त्यांच्या चाहत्यांतर्फे मालवणच्या या 'सुपरकाॅप सुपुत्राला' वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढिल सुपर वाटचालीसाठी उचित् सामर्थ्य लाभो या सदिच्छा.

आपली सिंधुनगरी चॅनेल

error: Content is protected !!