संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागास महामंडळ ,जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचे कडून विविध योजनांमधून लाभार्थीनी कर्ज घेतलेले असून थकीत कर्जाची अद्याप परतफेड केलेली नाही अशा कर्जदारासाठी शासनाने एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजात ५०% सवलत देऊन कर्ज खाते बंद करता येणार आहे. ही योजना काही कालावधी करीता असून ज्या लाभार्थी चे कर्ज शिल्लक आहे अशा थकीत कर्जदारांनी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्षे आहे व वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाख पेक्षा कमी आहे अशा लाभार्थींना महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रुपये १० लाख पर्यंत योजनेचा लाभ घेता येईल . असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती प्रीती पटेल यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय संपर्क ०२३६२ २२८११९ / ८६६८८९८९५०या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी,तालुका कुडाळ येथे भेट द्यावी अशी माहिती देण्यात आली आहे .