६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने जीवनदायी विकास संस्था – वेंगुर्ला हे तेच ‘खरं सांगायचं तर’ हे दोन अंकी नाटक आज सायंकाळी ०७ वाजता होणार सादर..
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ‘कळत नकळत’ नाट्य आदरांजली.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह साक्षी असलेला एक वेगळा योगायोग आहे. आजच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले, आजच्याच दिवशी पंधरा वर्षांपूर्वी ‘खरं सांगायचं तर’ हे त्यांचे नाटक मामा वरेरकर नाट्यगृहात सादर झाले आणि तिथून मामा वरेरकर नाट्यगृहाची वैभवशाली परंपरा सुरु झाली आणि आजच
महाराष्ट्र शासनातर्फे सुरु असलेल्या ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने जीवनदायी विकास संस्था – वेंगुर्ला हे तेच ‘खरं सांगायचं तर’ हे दोन अंकी नाटक आज सायंकाळी ०७ वाजता नाट्यगृहात सादर करणार आहेत.

नाट्य योगाने अतिशय ‘कळत नकळत’ ही नाट्य आदरांजली वाहिली जात आहे. मालवण नाट्य रसिकांची पावले आज मामा वरेरकर नाट्यगृह येथे नक्कीच वळतील….आदरांजली साठी…आठवणीसाठी आणि आभारासाठी एका ज्येष्ठ कलावंत जीवनाच्या..!