मसुरे | प्रतिनिधी :
वक्रतुंड नवयुवक मित्रमंडळ दोडामार्ग आयोजित दीपावली शो टाईम खुल्या राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची दिक्षा प्रमोद नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेमध्ये गोवा सिंधुदुर्ग मधून 37 स्पर्धकांनी सहभाग घेतला.या यशाबद्दल दिक्षाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.तिने किन्नर लोकांची व्यथा आपल्या नृत्यातून मांडली आहे.त्यांतून सामाजिक भावना जपासात तिने एक सामाजिक संदेश देणार नृत्य सादर केल.हे नृत्य परीक्षक आणि उपस्थित प्रेक्षक यांच्या पसंतीस उतरले आणि दिक्षा या स्पर्धेत अव्वल आली.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नंदिनी बिले,तृतीय क्रमांक पूजा राणे,उत्तेजनार्थ समर्थ गवंडी,उत्तेजनार्थ मृणाल सावंत यांनी मिळविला.
स्पर्धेचे परीक्षण गोवा चे परीक्षक श्री करण आणि श्री तुळशीदास आर्लेकर यांनी केले.यावेळी अध्यक्ष श्री.मनोज पार्सेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण,सुदेश मळीक,प्रकाश सावंत, विशाल मणेरीकर,विशाल चव्हाण,राजेश फुलारी, शुभम गावडे,समीर रेडकर,रोहित हळदणकर,
गोकुळदास बोन्द्रे , या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ सोहळा झाला.