संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध चित्रकला स्पर्धेत देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर, कुवळेच्या विद्यार्थ्यांनी सहा सुवर्ण, तीन रौप्य, तीन कांस्य पदके पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध चित्रकला प्रकारातील स्पर्धेत झाले होते. रेखाटन स्पर्धेत दीक्षिता खाड्ये, तर व्यंगचित्र स्पर्धेत साई कोकम या दोघांनी आर्ट मेरिट अवॉर्ड पटकावले आहे. हस्ताक्षर स्पर्धेत सिद्धी फाळके, दिव्या कदम, रंगभरण स्पर्धेत वेदांत वळंजु, टॅटू स्पर्धेत प्रीती परब, व्यंगचित्र स्पर्धेत दीक्षिता खाड्ये, कोलाज स्पर्धेत पूर्वा लाड या सहा विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके पटकावली. पदके पटकावली. छायाचित्रण स्पर्धेत कुणाल पताडे, व्यंगचित्र स्पर्धेत शुभम पवार, रंगभरण स्पर्धेत दीक्षिता खाड्ये या तिघांनीही रौप्य पदके पटकावली.
भेटकार्ड स्पर्धेत पूर्वा लाड, कोलाज स्पर्धेत साई कोकम, रंगभरण स्पर्धेत वेदांत कोरगावकर हे तिघेही कांस्य पदकाचे मानकरी ठरले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका प्रणिता कदम यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कलें, सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मुख्याध्यापक संतोष साटम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.