विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
जिल्हास्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धा मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाल्या.सदर स्पर्धेत चार गट सहभागी झाले होते.सतरा वर्षा खालील मुलांन मध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आर. पी. डी हायस्कूल सावंतवाडी व्दितीय क्रमांक तर प्रगत विद्यामंदिर रामगड प्रशालेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सतरा वर्षाखालील मुलींनमध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रथम क्रमांक, शिवाजी विद्यालय काळसे व्दितिय क्रमांक प्राप्त केला.
एकोणीस वर्षा खालील मुलींन मध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रथम क्रमांक तर वराड हायस्कूल व्दितीय क्रमांक तसेच एकोणीस वर्षा खालील मुलांन मध्ये पणदूर हायस्कूल प्रथम क्रमांक व जनता विद्या मंदिर त्रिंबक व्दितीय क्रमांक प्राप्त केला. विजयी संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन जनता विद्या मंदिर त्रिंबक माध्यमिक शिक्षण समिती अध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ, माजी अध्यक्ष प्रताप बागवे, त्रिंबक गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास(राजू) त्रिंबककर, उपसरपंच प्रमोद बागवे, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, मालवण क्रीडा समन्वयक जिल्हा क्रीडा महासंघ अध्यक्ष अजय शिंदे, मालवण क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, श्री धुरे, गायकवाड, गोसावी, सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक, जिल्ह्यातील अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते.