29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ॲडलेड ओव्हल…ॲड द स्पाईस ॲन्ड लीड द वर्ल्ड..!

- Advertisement -
- Advertisement -

क्रीडा विशेष | २०२२ टी ट्वेंटी विश्वचषक : आज भारत विरुद्ध इंग्लंड असा टी ट्वेंटी विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ॲडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे.

२००३ सालापासून भारतीय संघासाठी सलगपणे यशस्वी ठरलेल्या परदेशी मैदानांपैकी एक मैदान म्हणजे ॲडलेड ओव्हल आहे. पण याचा अर्थ ॲडलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघ भाग्यवान वगैरे ठरतो असे नाही तर या मैदानात मिळवलेल्या प्रत्येक विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाला एकत्रीत होऊन संघर्ष करुन विजय मिळालेला आहे आणि तो प्रत्येक विजय अभिमानास्पद आहे हे वास्तव आहे.

२००३ साली द्रविड,लक्ष्मण, तेंडुलकर व आगरकर यांच्या एकत्रीत प्रयत्नांनी ते साकार झाले होते…नंतर पुढे जाऊन विराट कोहलीसाठी ॲडलेड ओव्हल मैदानावर एक वेगळी ऊर्जा जाणवू लागली आणि आता ॲडलेड ओव्हल मैदान अगदी घरचे मैदान वाटू लागले आहे.

आज काळ बदललाय..क्रिकेट खेळाच्या नियमांसकट त्याचे सादरीकरण बदलले आहे. इतिहास व भविष्य यांचा विचार न करता ‘फक्त आजचा सामना’ यांवर विचार करुन खेळाडू कृती करत असतात. भारतीय संघाला रोहीत शर्माच्या रुपाने एक नैसर्गिक कर्णधार लाभलेला आहे. जो स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकाच दबावाखाली खेळतो. थोडक्यात तो क्रिकेट खेळतो पण क्रिकेटच्या स्तराचे व दडपणाचे ओझे घेऊन खेळत नाही.

इंग्लिश संघासाठी गेली ५ वर्षे ही थोडी वरचढ आहेत पण शेवटी तो ही इतिहासच आहे. बटलर सारखा शैलीदार मुक्त फलंदाज व कर्णधार त्यांच्याकडे आहे. बाकिचे खेळाडू सुद्धा आपापली कामगिरी उत्तम सांभाळतात.

दोन्ही संघात सगळं बरोबरीचे आहे…पण भारतीय संघाकडे दोन गोष्टी थोड्या अधिक आहेत..पहिली म्हणजे ॲडलेड वरचा विराट कोहली आणि दुसरा म्हणजे तळपणारा सूर्यकुमार यादव..!

ॲडलेडवरील आजच्या सामन्यात तोच अधिकचा ‘स्पाईस’ ॲड होऊन भारताला ट्राॅफी साठी हे घटक लीड करतील हीच तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे.

ॲडलेड ओव्हल…ॲड द स्पाईस ॲन्ड लीड द वर्ल्ड..!

(आपली सिंधुनगरी चॅनेल विशेष)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

क्रीडा विशेष | २०२२ टी ट्वेंटी विश्वचषक : आज भारत विरुद्ध इंग्लंड असा टी ट्वेंटी विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ॲडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे.

२००३ सालापासून भारतीय संघासाठी सलगपणे यशस्वी ठरलेल्या परदेशी मैदानांपैकी एक मैदान म्हणजे ॲडलेड ओव्हल आहे. पण याचा अर्थ ॲडलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघ भाग्यवान वगैरे ठरतो असे नाही तर या मैदानात मिळवलेल्या प्रत्येक विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाला एकत्रीत होऊन संघर्ष करुन विजय मिळालेला आहे आणि तो प्रत्येक विजय अभिमानास्पद आहे हे वास्तव आहे.

२००३ साली द्रविड,लक्ष्मण, तेंडुलकर व आगरकर यांच्या एकत्रीत प्रयत्नांनी ते साकार झाले होते…नंतर पुढे जाऊन विराट कोहलीसाठी ॲडलेड ओव्हल मैदानावर एक वेगळी ऊर्जा जाणवू लागली आणि आता ॲडलेड ओव्हल मैदान अगदी घरचे मैदान वाटू लागले आहे.

आज काळ बदललाय..क्रिकेट खेळाच्या नियमांसकट त्याचे सादरीकरण बदलले आहे. इतिहास व भविष्य यांचा विचार न करता 'फक्त आजचा सामना' यांवर विचार करुन खेळाडू कृती करत असतात. भारतीय संघाला रोहीत शर्माच्या रुपाने एक नैसर्गिक कर्णधार लाभलेला आहे. जो स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकाच दबावाखाली खेळतो. थोडक्यात तो क्रिकेट खेळतो पण क्रिकेटच्या स्तराचे व दडपणाचे ओझे घेऊन खेळत नाही.

इंग्लिश संघासाठी गेली ५ वर्षे ही थोडी वरचढ आहेत पण शेवटी तो ही इतिहासच आहे. बटलर सारखा शैलीदार मुक्त फलंदाज व कर्णधार त्यांच्याकडे आहे. बाकिचे खेळाडू सुद्धा आपापली कामगिरी उत्तम सांभाळतात.

दोन्ही संघात सगळं बरोबरीचे आहे…पण भारतीय संघाकडे दोन गोष्टी थोड्या अधिक आहेत..पहिली म्हणजे ॲडलेड वरचा विराट कोहली आणि दुसरा म्हणजे तळपणारा सूर्यकुमार यादव..!

ॲडलेडवरील आजच्या सामन्यात तोच अधिकचा 'स्पाईस' ॲड होऊन भारताला ट्राॅफी साठी हे घटक लीड करतील हीच तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे.

ॲडलेड ओव्हल…ॲड द स्पाईस ॲन्ड लीड द वर्ल्ड..!

(आपली सिंधुनगरी चॅनेल विशेष)

error: Content is protected !!