शासनाचा कालिदास पुरस्कार झालाय प्राप्त
विवेक परब / आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वेदपाठशाळेचे गुरुजी वेदाचार्य दत्तात्रय (दत्ता) महादेव मुरवणे यांना शासनाचा मानाचा समजला जाणारा सन 2018 चा कालिदास पुरस्कार तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे हस्ते नागपुर येथे देण्यात आला. श्री मुरवणे याना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल वायंगणी गावातील माजी उपसरपंच श्री हनुमंत गणेश प्रभू व निवृत्त केंद्र प्रमुख श्री लक्ष्मण गणेश प्रभू आणि प्रभू कुटुंबीय यांचेकडून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.दत्तात्रय मुरवणे याना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे गावाचा सन्मान झाला असल्याचे यावेळी हनुमंत प्रभू म्हणाले.