मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/मसुरे : मानवता विकास परिषद मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांतभाई सावंत यांनी मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनला भेट देत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे त्यावेळचे निकटवर्ती आणी विश्वासू सहकारी असलेल्या सावंत यांनि मातृत्व आधार फाउंडेशन करत असलेल्या कामांचा आढावा घेऊन भविष्यात समाजातील तळागाळातील लोकांसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनान बद्दल चर्चा केली.
यावेळी मातृत्व संस्थेचे सर्वेसर्वा संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, जयवंत लुडबे, भालचंद्र लुडबे, राहुल नरे, सामाजिक कार्यकर्ते बाबु ढोले, जगदीश तोडणकर विजय तळगावकर आणी अन्य उपस्थित होते.